Accident News : पाचोऱ्यात मंदिराच्या ओट्याला धडक; दोघांनी गमावले पाय... मात्र माणुसकी ओशाळली!

Accidental Mahindra pick-up and crushed two-wheeler that collided with Dutt Mandir on the National Highway.
Accidental Mahindra pick-up and crushed two-wheeler that collided with Dutt Mandir on the National Highway.esakal

Jalgaon News : येथील राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील महाराणा प्रताप चौकातील दत्त मंदिराच्या ओट्यावर मुंबईकडून भरधाव येणारी महिंद्रा पिकअप धडकून त्यात चार जण जखमी झाले. दोघांचे पाय तुटले असून दुचाकीचाही चुराडा झाला.

ही घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी चालक, क्लीनर व अपघातग्रस्त पिकअप ताब्यात घेतली आहे. (Mahindra pickup collided with Datta Mandir injuring four people jalgaon accident news)

मुंबई येथून बुलढाण्याकडे फळे घेऊन जाणारी भरधाव महेंद्र पिकअप मालवाहू गाडी (क्रमांक एमएच ४८ : बीएम ७९४३) शुक्रवारी (ता. १२) पहाटे साडेपाचच्या सुमारास वळणावरील महाराणा प्रताप चौकातील दत्त मंदिराच्या ओट्यावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की ओट्यावर बसलेल्या दोघांच्या पायाचे तुकडे झाले.

पहाटे या रस्त्याने फिरणाऱ्यांची गर्दी असल्याने जोरात झालेल्या आवाजामुळे गर्दी जमली. दोघांचे पाय तुटून रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे पाहून काहींना भोवळ आली. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी रूग्णवाहिका चालक बबलू पाटील, नरसिंग भुरे यांना बोलावून जखमींना रुग्णालयात रवाना केले.

संतप्त जमावाने गाडी चालक व क्लीनरला पुढील काचेतून बाहेर काढून प्रचंड रोष व्यक्त केला. सचिन सोमवंशी, प्रा. सी. एन. चौधरी यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस कर्मचारी योगेश पाटील, राहुल बेहरे लगबगीने घटनास्थळी आले व त्यांनी जमाव शांत करत चालक व क्लिनरला ताब्यात घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accidental Mahindra pick-up and crushed two-wheeler that collided with Dutt Mandir on the National Highway.
Jalgaon Crime : हळदीत धक्का मारल्याच्या कारणावरुन सशस्त्र हल्ला

या अपघातात विनोद पाटील (वय ३५), कुंदन परदेशी (१७, रा. पुनगाव), अमोल वाघ (२६, रा. पाचोरा), वसंत पाटील (४२) हे चौघे जखमी झाले. विनोद पाटील व वसंत पाटील या दोघांच्या पायाचे जागेवर तुकडे पडले. तसेच या मंदिराच्या ओट्याजवळ लावलेली होंडा शाईन कंपनीची दुचाकी (एमएच १९, ईडी ३४९२) च्या पिकपच्या धडकेने अक्षरशः चुराडा झाला. दरम्यान, पिकअप चालक, मालक पवन गोटी व क्लिनर सावन गोटी (दोघे रा. वसई) व अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.

राष्ट्रीय महामार्गावरील अंतुर्ली फाटा ते जळगाव चौफुली पर्यंतच्या भागात आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी गतिरोधक असावेत अथवा वाहनांचा वेग नियंत्रण करणारी व दंडात्मक यंत्रणा कार्यरत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. यापुढे असे अपघात होऊन जीवित हानी झाल्यास संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा कॉंग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी दिला आहे.

डॉक्टरांचे रक्तदान

जखमी विनोद पाटील यास एबी पॉझिटिव्ह या दुर्मिळ गटाचे रक्त लागत असल्याने डॉ. सागर गरुड, सचिन सोमवंशी यांनी लिलावती हॉस्पिटलचे डॉ. वैभव सूर्यवंशी यांना बोलावून त्यांचे रक्त काढले. जखमी विनोद पाटीलला तत्काळ रक्त मिळाल्याने त्याचा जीव वाचला. विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. सागर गरुड, डॉ. सचिन वाघ, डॉ. प्रवीण देशमुख, नरेश पाटील, विजय पाटील यांनी जखमींवर तातडीने शर्थीचे उपचार केले.

Accidental Mahindra pick-up and crushed two-wheeler that collided with Dutt Mandir on the National Highway.
Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गवर तिहेरी अपघात; 5 जण जखमी

लग्नासाठी आले आणि पाय गमवून बसले

वसंत पाटील हे सुरतहून लक्झरीने पाचोरा येथे लग्नासाठी आले होते. ते महाराणा प्रताप चौकात उतरले. चहा घेतला व अमोल वाघ यास पत्ता विचारत असताना पिकअप येऊन धडकली व त्यांचे दोन्ही पाय तुटून ते खाली कोसळले.

लग्नासाठी आले आणि दोघे पाय गमावले, असा प्रसंग त्यांच्यावर ओढवला. विनोद पाटील हा घरातला कर्ता असून, त्याचेही दोन्ही पाय तुटल्याने वाळू वाहतुकदार बेरोजगार तरुणांनी पैसे जमवून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.-

माणुसकी ओशाळली

अपघातानंतरचे भयावह चित्र समोर असताना काहींनी अपघातग्रस्त वाहनातील सफरचंदाचे खोके पळविण्यात स्वतःला धन्य मानले. काहींनी त्यांना अरे काही माणुसकी आहे का? असा प्रश्न केला. परंतु त्यांनी माणुसकीला काळीमा फासत सफरचंदाचे खोके पळवले.

Accidental Mahindra pick-up and crushed two-wheeler that collided with Dutt Mandir on the National Highway.
Jalgaon News : जिल्ह्यातील 2 महिलांचा ‘उष्माघात’सदृश स्थितीने मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com