MP Unmesh Patil while inspecting the proposed site for the Technology Extension Center in the area of ​​Government Tannariketan in the city on Friday. 
जळगाव

Technology Extension Centre: जळगावात तंत्रज्ञान विस्तार केंद्रासाठी 20 कोटींचा निधी; केंद्र सरकारची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Technology Extension Centre : केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत देशभरात तंत्रज्ञान केंद्र व संलग्न विस्तार केंद्र स्थापन केले जाणार आहेत. त्याअंतर्गत जळगावातील केंद्रासाठी २० कोटींचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानाच्या वापराकरीता साहाय्य करणे, तांत्रिकदृष्ट्या कुशल मनुष्यबळ निर्माण करणे तसेच व्यवसाय व तांत्रिक मार्गदर्शन सेवा उपलब्ध करणे, सूक्ष्म- लघू व मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. (20 crore fund for technology extension center in Jalgaon news)

शासकीय तंत्रनिकेतनात जागेची पाहणी

शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथे जागा पाहणी करण्यात आली. यावेळी खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, राज्य तंत्र निकेतन बोर्डाचे सदस्य भरत अमळकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक राजेंद्र डोंगरे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. संतोष गाजरे, शासकीय पॉलिटेक्निक प्राचार्य डॉ.पराग पाटील, आयटीआयचे संजय पाटील, लघु उद्योग भारतीचे समीर साने, जिल्हा उद्योग आघाडीचे संतोष इंगळे, मंडळ अध्यक्ष अजित राणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तंत्रज्ञान केंद्रांची स्थिती

सद्य:स्थितीत देशात १८ तंत्रज्ञान केंद्रे कार्यरत असून त्यापैकी राज्यात छत्रपती संभाजीनगर (इंडो जर्मन टूल रूम) व मुंबई या ठिकाणी दोन केंद्रे कार्यरत आहेत. केंद्र शासनाने नव्याने राज्यात पुणे, नागपूर व सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्रासाठी मंजुरी दिलेली आहे. नव्याने मंजूर ३ तंत्रज्ञान केंद्रांसाठी एमआयडीसी संस्थेने केंद्र शासनास पुणे व नागपूर येथील जागेचे हस्तांतरण केले असून सिंधुदुर्ग येथील जागा केंद्र शासनाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या स्तरावर सुरु आहे.

याच धर्तीवर जळगाव येथील टेक्नॉलॉजी सेंटरला संलग्न एक्स्टेंशन सेंटरसाठी निधी मंजूर झाला आहे. केंद्र शासनाच्या एमएसएमई मंत्रालय यांच्यामार्फत या टेक्नोलॉजी सेंटर्स व त्यांच्या आधिपत्याखालील एक्सटेन्शन सेंटर्स स्थापन करण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

त्यादृष्टीने टेक्नोलॉजी सेंटर्सचे अधिक विकेंद्रीकरण होण्यासाठी, अधिकाधिक टेक्नोलॉजी सेंटर्सना संलग्न एक्सटेन्शन सेंटर्स प्रत्येक जिल्हयात स्थापन होण्यासाठी उद्योग विभागाकडून समन्वय करण्यात येत आहे. या एक्सटेंशन सेंटरमार्फत आधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत सुविधा स्थानिक उद्योजक, नवउद्योजक तसेच तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.

"तंत्रज्ञान केंद्रामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रास चालना मिळून अधिकाधिक रोजगार व नवउद्योजक तयार होणार असून नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा आत्मनिर्भर युवक तयार होणार असल्याचा आनंद आहे." - उन्मेष पाटील, खासदार, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: अखेर बिहारमध्ये रणशिंग फुंकलं! निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

Jasprit Bumrah: '...तर कदाचित बुमराह कधी गोलंदाजी करू शकला नसता', मोहम्मद सिराजने उलगडलं बुमराहच्या 'वर्कलोड'चं कोडं

Agricultural News : अतिवृष्टीने मजुरांच्या स्वप्नांची राखरांगोळी: पाचोरा तालुक्यात शेतीत काम मिळेनासे झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

SCROLL FOR NEXT