abuse esakal
जळगाव

Jalgaon Crime News : आई-वडिलांना अडकवण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आत्महत्या करून त्यात तुझ्या आई-वडिलांना अडकवेल, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या एकास अमळनेर न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (20 years imprisonment for girl abduction and torture accused jalgaon crime news)

अकुलखेडा (ता.चोपडा) येथील दीपक रवींद्र भिल (वय २१) याने गावातील एका १४ वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात अडकविले होते. त्यात ५ फेब्रुवारी २०२० ला तिला घरातून पळवून नेले होते. याबाबत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तरुणावर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक तुरनर सखाराम, विजया वसावे, महिला पोलिस विद्या इंगळे या पथकाला ही मुलगी देवळाली (ता. करमाळा, जि. सोलापूर) या ठिकाणी आढळून आली होती. तरुणाने जर माझ्यासोबत लग्न नाही केले तर मी जिवाचे बरेवाईट करेल आणि त्यात तुझ्या आई-वडिलांना अडकवेल, अशी धमकी दिल्याने पीडित मुलगी नाइलाजाने तरुणासोबत गेली होती.

त्या ठिकाणी तरुणाने पीडित मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले, असे पीडित मुलीने जबाबात म्हटले. या खटल्यात सरकारी वकील शशिकांत पाटील यांनी युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी उदयसिंग साळुंखे, हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर यांनी काम पाहिले.

..असे कलम, अशी शिक्षा

या खटल्यात १४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यात पीडित मुलीची साक्ष, ग्रामविकास अधिकारी यांची पीडित मुलीच्या वयाबाबत साक्ष, डॉ. नरेंद्र पाटील व पीडित मुलीची आई यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. यावरून जिल्हा न्यायाधीश-२ पी. आर. चौधरी यांनी आरोपीस भादंवि कलम ३६३, ३७६ ‘अ’ नुसार सात वर्षे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा ४ नुसार २० वर्षे व कलम ८ नुसार ३ वर्षे अशी शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT