Sharad Pawar
Sharad Pawar sakal
जळगाव

जळगाव : संसदीय कामकाजाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांशी परिसंवाद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संसदीय कामकाजाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त चांदसर (ता. धरणगाव) येथे केळी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

शरद पवार यांचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा व राज्यसभा या राज्याच्या व देशाच्या कायदे मंडळाच्या कामकाजाचा २२ फेब्रुवारी १९६७ ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ५५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक विकास पवार यांनी चांदसर (ता. धरणगाव) येथे दुपारी दोन वाजता आधुनिक केळी लागवड- तंत्रज्ञान व निर्यात या विषयावर केळी परिसंवाद आयोजित केला आहे. यावेळी केळी तज्ज्ञ व मार्गदर्शक, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाबनानाचे अध्यक्ष भागवतराव पाटील (निंबोल, ता. रावेर) असतील. सत्कार माजी आमदार मनिष जैन यांच्या हस्ते करण्यात येईल. प्रमुख पाहूणे म्हणून निर्यातदार शेतकरी प्रशांत महाजन असतील. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे अवाहन विकास पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT