85 camels in custody of police in chopda jalgaon news esakal
जळगाव

Camel Smuggling: चोपड्यात 85 उंट पोलिसांच्या ताब्यात; क्रूर, निर्दयी वागणूक देणाऱ्या 4 जणांना अटक

उंट १६ लाख ३१ हजारांचे असून, त्यांची तस्करी आहे की खरेदी विक्रीतून त्यांचे स्थलांतर केले जात होते, यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Camel Smuggling : तालुक्यातील शिरपूर - चोपडा रस्त्यावरील गलंगी गावाच्या हद्दीत पुरेसे अन्नपाणी न देता उंटांची अवैधरीत्या क्रूर व निर्दयीतेने गुजरातमधील भूज, कच्छ येथून जाणारा ८५ उंटांचा जत्था अडवून सर्व उंट ताब्यात घेत चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) सकाळी सहाला कारवाई केली. (85 camels in custody of police in chopda jalgaon news)

या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या उंटांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. हे उंट १६ लाख ३१ हजारांचे असून, त्यांची तस्करी आहे की खरेदी विक्रीतून त्यांचे स्थलांतर केले जात होते, यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत. या उंटांसदर्भातील शहरात पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत रितेश रामकृष्ण माळी यांनी फिर्याद दिल्यानुसार ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी (ता. २८) सकाळी सहाच्या सुमारास चोपडा ते शिरपूर रस्त्यावरून जाताना गलंगी गावाच्या हद्दीत सोमाभाई मेधा रबारी (वय ५३, रा. लियारी, ता. अबडासा, जि. भूज, गुजरात), लाखाभाई देवाभाई रबारी (वय ५४, रा. बांड, ता. बुधरा, जि. भूज), वज्रभाई रबारी लालाभाई दबाय (वय ३७, रा. मोधारा, ता. हलिया, जि. भूज), बाधाभाई मेधाभाई रबारी (वय ४९, रा. लिधारी, ता. नलोया, जि. भूज) यांनी त्यांच्या मालकीचे ५ ते ९ वर्षे वयोगटाचे लहान, मोठे तपकिरी रंगाचे, कृच्ची जातीचे, आखूड शेपटीचे १६ लाख ३१ हजार रुपये किमतीचे एकूण ८५ उंट, पाना भूज, गुजरात येथून पायी चालवीत घेऊन येऊन त्यांचा छळ करीत त्यांना आराम न क्रूरतेने त्यांना पुरेसे अन्न, पाणी न देता त्यांना पायी चालवित घेऊन आले.

या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू महाजन तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT