जळगाव

महामार्गावर अपघात सत्र सुरूच; अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस दलाचे विधी अधिकारीचा मृत्यू  

रईस शेख

जळगाव :  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघातांची मालिका सुरूच असून आज अज्ञात वाहनाने पारोळाकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देत पेाबारा केला. या अपघातात दुचाकीस्वार पोलीस दलाचे विधी अधीकारी ॲड. दुर्गादासगिरी गोसावी जागीच ठार झाले असून त्याच्या सोबतचा पेालीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना सकाळी घडली. दोघेही दुचाकीने पारेाळा येथे निघाले होते. 

जिल्हा पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून कार्यरत ॲड. दुर्गादासगिरी मधुकर गोसावी आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे पेालिस कर्मचारी संदीप भीकन पाटील असे दोघेही आज दुचाकी (एमएच १९ बीएफ १८८६ )ने जळगावहून पारोळ्याकडे द्वारदर्शनसाठी निघाले होते. 

बांभोरी जवळ त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुर्गादासगिरी मधुकर गोसावी (वय-३७, रा. पाचोरा) हे जागीच ठार झाले असून संदीप भीकन पाटील (वय -३५, रा. पोलीस वसाहत, जळगाव) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Trump call: जागतिक समीकरणे बदलणार? मोदी-ट्रम्प ४० मिनिटं चर्चा; व्यापार करार अन् होर्मुझ सुरक्षेवर मोठे संकेत!

Vedanta Power Plant Accident : छत्तीसगड हादरलं ! पॉवर प्लॉंटमधील बॉयलर स्फोटात १० कामगार ठार, २३ जखमींची प्रकृती गंभीर

Bhim Jayanti: आमचा वर्षात एकच उत्सव... नियम का? भीम जयंतीत DJ बंदीवरून वरळीत नागरिक-पोलिस आमनेसामने; काय घडलं?

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

CSK vs KKR Live: संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवॉल्ड ब्रेव्हिसची फटकेबाजी... तरीही चेन्नई सुपर किंग्सची कोंडी; अजिंक्य रहाणेची स्मार्ट चाल

SCROLL FOR NEXT