accident 
जळगाव

भयंकर दुर्घटना: माॅर्निंग वाॅकला दोघी निघाल्या आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाल्या

महेंद्र साळुंखे

सामनेर ः ता. पाचोरा सामनेर येथे आज सकाळी 5  ते  5:30 वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेश दारासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वाक करत असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच ठार झाले.


सविस्तर वृत्त असे की सामनेर येथील महिला नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सामनेर ते लासगाव दरम्यान रोज पुरुष व महिला सकाळी मॉर्निंग साठी जात असतात यावेळी सकाळी पाच ते साडे पाचच्या दरम्यान मनीषा साहेबराव पाटील (वय 50 )अनिता शहादु पाटील (वय 48) या दोघी महिला मॉर्निंग वॉक करून परत येत असताना अज्ञात कारने जोरदार धडक  दिली.

पन्नास मीटर फरफटत नेले

कारच्या धडकेत दोघी महिला जागीच ठार झाल्या. अपघात एवढा जोरदार होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. दुसरी महिलेस 50 मीटर फरफटत नेले. दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात  शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले घटनास्थळी पाचोरा पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल मोरे ,पो.हवा. रामदास चौधरी, पुढील तपास करीत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT