Bhalchadra Nemade statement on Ramayan Valmiki 
जळगाव

राम मांसाहारी की शाकाहारी? भालचंद्र नेमाडेंची वादात उडी; वाल्मिकीच्या रामायणाबाबत विचारला प्रश्न

Bhalchadra Nemade statement on Ramayan Valmiki: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण कथेबाबत भाष्य केलं आहे. यावरुन वाद निर्माण केला जाण्याची शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

जळगाव- ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण कथेबाबत भाष्य केलं आहे. यावरुन वाद निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. कोणता राम खरा मानायचा? वाल्मिकीचाच राम कशामुळे खरा? असा सवाल त्यांनी केला आहे. जळगावच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. (after ncp jitendra awhad writer bhalchadra nemade statement on ramayan valmiki non veg)

खरा राम कोणता समजायचा? वाल्मिकीचा रामच खरा का म्हणायचा? आसाममधील एका समूदायाच्या रामायणात सीता मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करत असते. रामाला शिव्या देत असते. तुला अक्कल नाही का? असं म्हणत असते. हे लोक आता फक्त १५ हजार राहिले आहेत. रामायणाच्या कथेचे विविध प्रकार आहेत. त्यामुळे कोणते रामायण खरं समजायचं, असं ते म्हणाले.

रामायण कथेचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येक कथेमध्ये विविधता आहे. वाल्मिकीच्या आधीही रामायण होते. ते बदलत बदलत वाल्मिकीपर्यंत आले. वाल्मिकी हा एका राजाच्या दरबारातील कवी होता. त्याने तेव्हा राजाला खूष करण्यासाठी त्याप्रमाणे रामायण लिहिले. देशाच्या विविध कोपऱ्यात त्यांच्या कथेमध्ये वेगवेगळा राम आहे. काही ठिकाणी सीता रावणाची मुलगी आहे. रामायण बदलत बदलत वाल्मिकीपर्यंत आले आहे, असंही ते म्हणाले.

लेखकाला न दिसणारे सत्य सापडले पाहिजे. राम मांसाहारी होता की शाकाहारी होता हे वाचूनच लक्षात येतं. वाल्मिकी सोडून इतर रामायण आपल्याला का वाचायला मिळत नाहीत? उत्तर मला माहितीये. पण, पोलीस प्रोटेक्शन असल्याने याव्यतरिक्त काही सांगणार नाही, असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्यही केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावं लागेल.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ronaldo: रोनाल्डोच्या फॉर्मवर लक्ष; पोर्तुगालचा आज सामना

CM Vijay Thalapathy Jan Gan Man: विजय थलपतींचा धाडसी निर्णय, तब्बल २५ वर्षांचा नियम मोडला; तामिळ विधानसभेत पहिल्यांदाच राष्ट्रगीत गायले

Petrol-Diesel-CNG Price: 23 जून रोजी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

Tawade Hotel Area Action : तावडे हॉटेल परिसरात 23 बांधकामे तोडली; महापालिकेची धडक कारवाई, अतिक्रमित झालेली 2900 चौरस मीटर जागा खुली

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT