after six years the price of bananas has gone up jalgaon sakal
जळगाव

केळीला सहा वर्षानंतर विक्रमी भाव

कापणी कमी : दोन हजारांचा टप्पा ओलांडला, उत्तर भारतात मोठी मागणी

सकाळ वृत्तसेवा

रावेर : सध्या रावेर तालुक्यासह जिल्ह्यात आणि लगतच्या मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर भागात कापणी योग्य केळी अतिशय कमी प्रमाणात असल्याने आणि उत्तर भारतात केळीची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने केळीला दोन हजार २०० रुपये क्विंटलपर्यंत विक्रमी भाव मिळत आहेत. २०१६-१७ नंतर प्रथमच केळीचे भाव क्विंटलला दोन हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत जून- जुलै महिन्यात लागवड झालेल्या केळीवर नंतर ‘सीएमव्ही’ या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला.

तसेच या काळात लागवड केलेली केळी ऐन कापणीच्या काळात मे अखेर आणि जून महिन्याच्या सुरवातीला येणाऱ्या संभाव्य वादळात सापडण्याची भीती असते. म्हणून गेल्या वर्षी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सुमारे २५ टक्के केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जून-जुलै महिन्यात केळी लागवड केली नाही. आता केळी कमी प्रमाणात कापणीला आली आहे.

बाजारपेठेत मागणी कायम

यावर्षी आंबा हवा त्या प्रमाणात न आल्याने केळीची मागणी उत्तर भारतातील बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी टिकून आहे. सध्या केळीची कापणी इतकी कमी झाली आहे की सावदा रेल्वेस्थानकातून दररोज केळी भरून जाणारा रेल्वे रॅक आता एक दिवसाआड जात आहे आणि आठवड्यातून तीन वेळा रावेर रेल्वेस्थानकातून भरून जाणारा रॅक आता आठवड्यातून एकदाच जात आहे.

काश्मीरमध्येही मागणी

उत्तर भारतातील श्रीनगर, पुलवामा, पठाणकोट या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या केळीला मोठी मागणी आहे. कागदी खोक्यात पॅकिंग करून ट्रकमधून केळी पाठवली जात आहे. उत्कृष्ट केळीची मागणी हरियाना आणि पंजाबमध्ये देखील आहे. या सर्व भागात पाठविल्या जाणाऱ्या केळीला दोन हजार ते २१०० रुपयांपेक्षा जास्त भाव व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे.

..तर आणखी भाववाढ

तालुक्यातील आणि जिल्ह्यातील केळीला २०१६-१७ या आर्थिक वर्षांत दोन हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाला होता. आता त्यानंतर जवळपास सहा वर्षांनी केळीला पुन्हा विक्रमी भाव मिळाले आहेत. गुजरातमधील केळीची आगामी पंधरवड्यात स्पर्धा करावी न लागल्यास हेच भाव किमान महिनाभर टिकून राहतील, अशी स्थिती आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे यावर्षी जिल्ह्यातून केळी निर्यातीचे प्रमाण नगण्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तळोजा जेल परिसरात बिबट्याचा वावर? व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर; वन विभागानं नेमकं काय सांगितलं?

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ५ दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार, 'या' भागांना फटका बसणार

MLA Fund : आमदारांच्‍या नशिबी फंडाची प्रतीक्षाच; वर्षभरात केवळ ६.९३ कोटींचा निधी

Crime Viral Video : प्रियसीसोबत बोलताना सापडला अन् प्रियकराला चोपचोपला, कोल्हापुरातील घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

India T20 World Cup 2026 Squad: हार्दिक पांड्याकडे पुन्हा उप कर्णधारपद? शुभमन गिलच्या निवडीवरून माजी खेळाडूचं मोठं विधान, बरोबर १ तासानंतर 'गेम' होणार?

SCROLL FOR NEXT