election news  esakal
जळगाव

Amalner Urban Bank Election : तब्बल 31 उमेदवारांनी घेतले 81 अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील अर्बन को.- ऑप बँकेची निवडणूक जाहीर होताच शेकडो इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली असून, पहिल्याच दिवशी गुरुवारी (ता. ४) इच्छुकांनी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. (Amalner Urban Bank Election 31 candidates took 81 applications jalgaon news)

पहिल्याच दिवशी ३१ जणांनी ८१ उमेदवारी अर्ज खरेदी केले, तर सर्वसाधारण प्रवर्गातून विद्यमान संचालक प्रदीप कुंदनलाल अग्रवाल व अनुसूचित जाती जमातीमधून रघुनाथ मोरे या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारी अर्ज खरेदी व दाखल करण्याची मुदत ११ मेपर्यंत असून, या मुदतीत उमेदवारी अर्जाचा पाऊसच यंदा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नगरपालिका निवडणूक लांबत चालली असल्याने बाशिंग बांधून तयार असलेले पालिकेतील इच्छुक उमेदवार कमालीचे नाराज आहेत. मात्र, अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने याच इच्छुकांना आता अर्बन बँकेचा संचालक होण्याचे डोहाळे लागले आहेत.

त्यासाठी ते तयारीला लागले आहेत. यामुळेच यंदा उमेदवारी करण्याची अनेकांची इच्छा असून, उमेदवारांची संख्या यंदा अधिक असण्याची शक्यता आहे. हवशा-गवशा-नवश्या उमेदवारांची संख्या अधिक राहणार असली, तरी खरी लढत तुल्यबळ उमेदवारांमध्येच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT