In the office of Marathi Sahitya Parishad, Dr. Council officers Tansen Jagtap, Manohar Andhale and other dignitaries while garlanding the image of Babasaheb.  esakal
जळगाव

Ambedkar Jayanti 2023 : बाबासाहेबांनी जातीय विषमतेच्या श्रुंखला तोडल्या : साहित्यिक मनोहर आंधळे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आपल्या अथांग अष्टावधानी...कुशाग्र बुद्धीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिढ्यांपिढ्यांच्या जातीय विषमतेच्या श्रुंखला तोडल्या आणि तळागाळातील बहुजन वंचितांना सामाजिक न्याय मिळवून दिला. (Ambedkar Jayanti 2023 Literary Manohar andhale statement Babasaheb broke chains of caste inequality jalgaon news)

त्यामुळेच या भीमगीताचा आधार घेत म्हणावेसे वाटते की ‘उद्धरली कोटी कुळे...भीमा तुझ्या जन्मामुळे!...असे प्रतिपादन मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मनोहर आंधळे यांनी केले.

येथील मसाप शाखेच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. १४) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत कवी आंधळे बोलत होते. संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्राचार्य तानसेन जगताप सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्याच हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या अभिवादन सभेस शाखेचे पदाधिकारी अनुक्रमे गणेश आढाव, नितीन खंडाळे, रामचंद्र गोसावी, शालिग्राम निकम, सुधीर देवरे, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य प्राचार्य बी. एल. ठाकरे व अशोक ब्राम्हणकार हे उपस्थीत होते.

या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील दामाजी नगर येथे होऊ घातलेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रकपदी प्राचार्य तानसेन जगताप यांची निमंत्रकपदी निवड झाल्याने कवी व साहित्यिक आंधळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

तर परीक्षा विभागप्रमुख सुधीर देवरे व प्राचार्य बी. एल. ठाकरे यांनी "मराठी भाषा प्रथम‘ परीक्षेसाठी परिश्रम घेऊन तत्परतेने सदर परीक्षेचा निकाल कळविल्याबद्दल शाखाध्यक्ष प्राचार्य जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यवाह नितीन खंडाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT