Bribe case
Bribe case  esakal
जळगाव

Jalgaon Bribe News : ‘महावितरण’च्या तंत्रज्ञासह पंटरला लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe News : वीजमीटर लावण्यासाठी दीड हजाराची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह (टेक्निशियन) खासगी सहाय्यकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. १९) पकडले. (Anti bribery department team arrested private assistant along with senior technician of Mahavitaran taking bribes jalgaon news)

तोरनाळे (ता. जामनेर) येथील तक्रारदाराने पत्र्याच्या शेडमध्ये वीजमीटर घेण्यासाठी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानुसार वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद पवार व त्यांचा सहायक (पंटर) कलिम तडवी या दोघांना दोन हजार रुपये डिमांड नोट भरण्यासाठी दिले. तरीदेखील वीजमीटर बसविले गेले नाही. यासाठी पवार याने पुन्हा दीड हजाराची मागणी केली.

पुन्हा पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून बुधवारी (ता. १९) फत्तेपूर ते पिंपळगाव रोडवरील बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या शेजारील बंद दुकानाजवळ दीड हजार रुपये स्वीकारताना पकडले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील आणि पोलिस कर्मचारी अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, बाळू मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने यांच्या पथकाने केली. याबाबत पहूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फत्तेपूर परिसरात केलेली ही अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

News Click Raid: न्यूजक्लिकच्या संपादकांची अटक अन् कोठडी अवैध; सुप्रीम कोर्टाने दिले सुटकेचे आदेश

Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Latest Marathi News Live Update : राजस्थान खाणीत १४ पैकी १० जणांना बाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT