Wasim Khan Kayub Khan
Wasim Khan Kayub Khan esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन गतीमंद बालिकेवर अत्याचार करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील सुभाष चौकात आत्यासोबत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १२ वर्षाच्या चिमुकलीवर दूरदर्शन टॉवर जवळील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी शनीपेठ पोलिसांनी या संशयिताच्या मुसक्या आवळत न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसाच्या पोलिस कोठडी दिली आहे.

वसीम खान कय्युब खान (वय-२५ रा. पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव) असे पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या संशयिताचे नाव आहे.(Arrested by police for abusing minor girl jalgaon crime news)

जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरात १२ वर्षीय बालिका कुटुंबीयांसह उघड्यावरच कुठेतरी आडोशाला राहते. पीडित बालिका गतीमंद असून तिच्या आत्यासोबत भीक मागून दोघेजण आपला उदरनिर्वाह करत असतात.

शुक्रवार(ता.५) सकाळी पीडित सुभाष चौक परिसरात भीक मागत असताना संशयित वसीम खान कय्युब खान (वय-२५ रा. पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव) याने पीडित मुलीला जवळ बोलावून तिला दुचाकी (एमएच १९ ईएच ५४३१) वर बसवून जळगाव भुसावळ महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी अत्याचार केल्या नंतर परत दुचाकीवर बसवून तिला सुभाष चौकात सोडून दिले.

पीडित चिमुकलीने घडला प्रकार आत्या आणि नातेवाइकांना सांगितला. त्यांनी तातडीने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पिडीतेचा महिला अधिकार्यांसमक्ष जाब-जबाब होवुन शुक्रवार(ता.५) संशयित वसीम खान कय्युब खान विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ममुराबाद येथून संशयित अटकेत

गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. संशयिताच्या वर्णनावरून त्याचा शोध घेण्यात येऊन रविवार(ता.७) रोजी मध्यरात्री दीड वाजता त्याच्या ममुराबाद येथील घरातून अटक केली आहे. दुपारी एकला जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती मोहीते यांच्या न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत करीत आहे..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT