file photo esakal
जळगाव

Jalgaon News : हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेना; शासनाचे वरातीमागून घोडे!

सकाळ वृत्तसेवा

वावडे (जि. जळगाव) : रब्बीतील हरभरा पीक (Crop) तयार होऊन पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही शासकीय खरेदीला सुरुवात झाली नसल्यामुळे शेतकरी

व्यापाऱ्यांना हरभऱ्याची विक्री करत असून, क्विंटल मागे ८०० ते हजार रुपयांचे नुकसान होत आहे. (As government procurement has not started farmers are selling gram to traders and are incurring loss per quintal jalgaon news)

त्यामुळे शासन हमीभावाने हरभरा खरेदी कधी करणार? असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्हा मार्केटिंग अधिकारी जळगाव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता अजून शासनाचे आदेश नसल्याचे सांगण्यात आले.

शासनाने दरवर्षी हरभऱ्याचा हमीभाव ५३३५ जाहीर केला आहे. देखील बाजार समितीमध्ये मात्र ३८०० ते ४५५० हा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. रब्बीतील हरभरा हे पीक महत्त्वाचे आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून हे पीक तयार होऊन हरभरा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे.

मागील आठवडाभरापासून हरभऱ्याची आवकही वाढली आहे. शेतकरी अडचणीत असल्यामुळे मिळेल, त्या भावात विक्री करीत आहेत. फेब्रुवारी महिना संपत आला तरी अजूनही शासनाने हमीभावाने हरभरा खरेदी सुरू केली नाही.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

परिणामी, शेतकऱ्यांची क्विंटल मागे आठशे ते हजार रुपयाचे नुकसान होत आहे. दरवर्षी शासनाचे वरातीमागून घोडे असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने फक्कड हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांसह शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

शेतकरी चिंतेत

शासनाकडून शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याला उशिर होत असतो. तोपर्यंत शेतकऱ्यांचा बराचसा शेतमाल हा खासगी व्यापाऱ्याला गरजेपोटी विक्री केला जातो. घाम गाळूनही शेतमालाला हमी भाव मिळत नाही.

शासन केवळ हमीभावाचे गाजर दाखवते. प्रत्यक्षात तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन बळीराजाला हातबट्ट्याचा खेळ दरवर्षी खेळावा लागतो. मात्र शासनाला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.

नाफेड व्यापाऱ्याच्याच फायद्याचे

सध्या रब्बीतील हरभरा शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. मार्च महिन्याअगोदर पीककर्ज भरणे आवश्यक असल्याने शेतकरी खुल्या बाजारात हरभरा विकत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल सातशे ते नऊशे रुपयाचे नुकसान होत आहे. नाफेडची खरेदी उशिरा सुरू केली तर ती व्यापाऱ्यांच्याच फायद्याची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये मोठी घडामोड! स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता 'या' पक्षाने अचानक निवडणुकीतूनच घेतली माघार

R Ashwin: 'भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही अप्रत्यक्षपणे घडतंय...' शमी-आगरकर वादानंतर अश्विनला नेमकं काय म्हणायचंय?

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT