Death News
Death News esakal
जळगाव

Jalgaon News : घरात शिरताच पित्याला दिसला मुलीचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आई आणि भाऊ बाहेरगावी, तर वडील कामाला गेल्याने घरात कोणीच नसताना कोमल वसंत भावसार (वय ३०, रा. रौनक कॉलनी, अयोध्यानगर) या तरुणीने घरात गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोमल ही बँकेत अकाऊंटन्ट म्हणून नोकरीला होती. तिची आई आणि भाऊ पुण्याला गेले असून, वडील वर्कशॉपमध्ये कामाला गेले असता, ती घरी एकटीच होती.(As soon as he entered house father body of girl seen thirty year old youth hanged himself Jalgaon news)

दुपारच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी वडील कामावरुन घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.

मुलीचा मृतदेह बघताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार अल्ताफ पठाण तपास करीत आहेत.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT