Assistant police officer of Chopra village arrested in bribe taking jalgaon crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : ‘चोपडा ग्रामीण’चा सहाय्यक फौजदार लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर असे लाचखोर सहाय्यक फौजदाराचे नाव आहे.

तक्रारदाराचा चुलत भाऊ व त्याचा मित्र यांना बुधवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास तीन पोलिसांनी लासूर ते सत्रासेन रस्त्यावर त्यांची मोटारसायकल अडवून थांबविले होते.

तुमच्याजवळ गांजा आहे, असे सांगून तुम्ही पोलिस ठाण्याला चला, असे त्यांना सांगितले. (Assistant police officer of Chopra village arrested in bribe taking jalgaon crime)

तुमच्याविरुद्ध गांजा प्रकरणी गुन्हा दाखल करायचा आहे. गांजा प्रकरणी कारवाई टाळायची असेल व मोटारसायकल सोडवायची असेल तर आम्हाला प्रत्येकी ७५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले होते.

तक्रारदाराच्या नातेवाइकांकडून पहाटे चारच्या सुमारास ३० हजार रुपये घेण्यात आले. मात्र, मोटारसायकल ठेवून घेतली. मोटारसायकल सोडवायची असल्यास राहिलेले २० हजार रुपये आम्हास द्यावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. गुरुवारी (ता. २४) तक्रारदाराकडे गांजाची केस न करण्यासह मोटारसायकल सोडविण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तडजोडीअंती १५ हजार रुपये पंचांसमक्ष सहायक फौजदार शिवाजी बाविस्कर यांनी घेतले. त्याच वेळी एसीबी पथकाने कारवाई केली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस कर्मचारी बाळू मराठे, राकेश दुसाने आदींनी कारवाई केली. पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT