Crime Latest Marathi News esakal
जळगाव

जळगाव : वरणगाव आयुध निर्माणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव : येथून जवळच असलेल्या केंद्रशासित युद्ध साहित्य व सामुग्री निर्माण करणाऱ्या कारखान्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणांवरून हाणामारी झाली. मात्र एकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोक्यात व हातावर टेबलावरील पेपरवेटने जीवघेणा हल्ला केल्याने जखमी अधिकाऱ्याने वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, संशयितास पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest Marathi News)

वरणगाव आयुध निर्माणीत येथील केंद्र सरकारच्या युद्ध साहित्य व सामग्री निर्माण कारखान्यात रविवारी (ता. १४) सकाळी अकरादरम्यान फिर्यादी आयुध निर्माणी वरणगावचे जॉइंट जीएम शैलेश रामचंद्र पाटील (वय ५१, रा. रेणुकानगर, वरणगाव) हे आयुध निर्माणीत कर्तव्यावर असताना संशयित अमृत पाल (एजीएम, आयुध निर्माणी वरणगाव) (रा. रेल्वे ऑफिसर कॉलनी, भुसावळ) हे वरिष्ठ अधिकारी शैलेश पाटील यांना न विचारता ड्यूटीवरून घरी निघून गेले होते. त्या संबंधी विचारणा केली असता त्याचा राग आल्याने अमृत पाल यांनी शैलेश पाटील यांच्या केबीनमध्ये येऊन टेबलावरील पेपरवेट हातात घेत शैलेश पाटील यांच्या डोक्यावर सात ते आठ वार करीत तर उजवा हात धरून दोन बोटे देखील फॅक्चर केली आहेत.

संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जखमी अधिकारी पाटील यांना आयुध निर्माणीतील रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करून खासगी रुग्णालयांत दाखल केले. वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांचे निदर्शनात आल्याने आयुध निर्माणीतील व्यवस्थेसोबत चर्चा करून प्रतिबंधक क्षेत्रातील पास घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयित अमृत पाल याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी घटनेचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT