Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News: केळी व्यापाऱ्याची 7 लाखांत फसवणूक; सौदा एका ट्रकचा अन् 2 ट्रक केले परस्पर नावावर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : केळी व्यापाऱ्याच्या दोन ट्रकांची परस्पर विक्री करून सुमारे सात लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली. (Banana trader cheated of 7 lakhs Deal of one truck and 2 trucks done in mutual name Jalgaon Crime News)

सावदा (ता. रावेर) येथील केळी व्यापारी देविदास राठोड (वय ३७) यांनी ३१ जानेवारीला जळगाव आरटीओ कार्यालयात एजंट शहादत अली यासीन अली (रा. फैजपूर) यांच्या मदतीने मुळ कागदपत्रांची पूर्तता करून ब्रिजेशकुमार प्रकाश यादव (रा. सावदा) यांच्या नावाने ट्रक (एमएच १९, झेड ६९५५) केला.

१९ फेब्रुवारीला देविदास राठोड यांनी ट्रक विक्री केल्याचे स्टेट्‌स ऑनलाइन चेक केले असता, त्यांनी विक्री केलेला ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांच्या नावाऐवजी अब्दुल रशीद अब्दुल अजीज (रा. मालेगाव) यांच्या नावे असल्याचे आढळून आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यांचा दुसरा ट्रक (एमएच १९, झेड ७०५५)चे परिवहन ॲपवर स्टेट्‌स चेक केले असता, तो ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांच्या नावावर दिसून आला. आपण एकच ट्रक विक्री केला असताना, दोन ट्रक वेगवेगळ्या नावावर कशा विक्री झाल्याचे दिसत आहे, म्हणून राठोड यांनी माहिती घेतली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत श्री. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात ब्रिजेशकुमार यादव व शहादत अली यासीन अली यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT