railway esakal
जळगाव

Special Train : अमरावती- पुणे, बडनेरा- नाशिकदरम्यान रेल्वेच्या उत्सव विशेष ट्रेन चालविणार

सकाळ वृत्तसेवा

Special Train : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अमरावती- पुणे, बडनेरा- नाशिकदरम्यान उत्सव विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन ५ नोव्हेंबरपासून सुरू होतील. (Between Amravati Pune Badnera Nashik Railway will run 36 Utsav special trains news)

अमरावती- पुणे विशेष (४ अप आणि ४ डाउन एकूण ८ सेवा) गाडी क्रमांक ०१२०९ विशेष अमरावती येथून ५ ते १९ नोव्हेबरपर्यंत दर रविवारी, बुधवारी १२.४० ला सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी पावणेतीनला पोचेल.

गाडी क्रमांक ०१२१० विशेष पुणे येथून ६ ते २० नोव्हेबरपर्यंत दर गुरुवार, सोमवारी साडेसहाला सुटेल. अमरावती येथे त्याच दिवशी रात्री आठला पोचेल.

थांबे : अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्डलाइन, उरुळी, हडपसर, पुणे.

बडनेरा ते नाशिक विशेष (१४ अप आणि १४ डाउन एकूण २८ सेवा) गाडी क्रमांक ०१२११ विशेष बडनेरा येथून ६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज ११ ला सुटेल. नाशिक येथे त्याच दिवशी सायंकाळी पावणेआठला पोचेल.

गाडी क्रमांक ०१२१२ विशेष नाशिक येथून ६ ते ११ नोव्हेंबरदरम्यान दररोज रात्री सव्वानऊला सुटेल. बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी साडेचारला पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक असे थांबे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT