Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : व्यवसायासाठी माहेरून तीन लाख आण; सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : माहेरहून व्यावसायासाठी तीन लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेच्या छळ करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रेणुका योगेश पाटील (वय २५; थाळनेर ता. शिरपूर जि.धुळे, हल्ली मुक्काम पारोळा) यांचे नंदुरबार येथील सासर असलेल्या विवाहितेचे पती योगेश सुदाम पाटील (रा. दत्त कॉलनी, कोरीट नाका नंदुरबार) यांच्यासोबत विवाह झाला होता. (Bring Three Lakh for Business Harassment of married woman by in laws Jalgaon Crime News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

लग्नानंतर महिनाभरानंतर योगेश सुदाम पाटील (पती), सुदाम भिका पाटील (सासरे), प्रमिला पाटील (सासू), रविना राकेश न्हावी (नणंद), विजय पाटील (दिर, सर्व रा. नंदुरबार) यांनी विवाहितेला माहेरून तुझ्या वडिलांकडून आम्हाला नंदुरबार येथे व्यवसायासाठी तीन लाख रुपये आणावे म्हणून सांगितले.

विवाहितेने नकार दिला असता सर्व मंडळींनी शिवीगाळ व मारहाण केली, तसेच मानसिक त्रास देऊन छळ केला. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT