Sadashiv Patil
Sadashiv Patil esakal
जळगाव

World Cancer Day 2024 : कर्करोगात वेळीच उपचार, जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आजारावर मात

तुषार पाटील

World Cancer Day 2024 : कर्करोग ही समस्या नसून कर्करोग झाल्यानंतर आयुष्य जगणे हे खरे आव्हान आहे. कर्करोगग्रस्त रुग्णासोबत कुटुंबातील इतर सदस्यांची देखील मोठी मानसिक परवड होते. कर्करोगात माणूस प्रामुख्याने मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. मात्र कर्करोगात वेळीच उपचार व जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आयुष्यभर निरोगी जीवन जगता येते.

याचे मूर्तिमंत उदाहरण एरंडोल येथील सर्वसामान्य शेतकरी सदाशिव झंडू पाटील यांच्याकडे बघितल्यावर कळते. कर्करोग झाल्यानंतर आयुष्य संपत नसते. कुटुंबातील सदस्यांनी मानसिक आधार दिल्यानंतर तुम्ही या आजारातून बरे होऊन सर्वसामान्य जीवन जगू शकतात.

एरंडोल येथील गुजर गल्लीत राहणारे सदाशिव झंडू पाटील हे सर्वसामान्य शेतकरी. विडी ओढण्याचे त्यांना व्यसन होते २०१२ ला त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची लहान मुलगी ज्योती चौधरी यांनी त्यांना तातडीने मुंबई येथे हलविले.

सर्व तपासणी केल्यानंतर त्यांना फुप्फुसाच्या कर्करोग झाल्याचे निदान झाले. सदाशिव पाटील यांची घरची परिस्थिती तशी साधारणच. कुटुंबातील सदस्यांसाठी तो मोठाच धक्का होता. मात्र जावई शरद चौधरी व मुलगी ज्योती चौधरी यांनी खचून न जाता कर्करोगावरील उपचार करण्याची तयारी दर्शविली.

मुलगी असून देखील त्यांनी मुलाप्रमाणे वडिलांची सेवा केली. जावई शरद चौधरी यांनी प्रोत्साहन दिले. केमोथेरपी आणि रेडिएशन पूर्ण घेतल्यानंतर सदाशिव पाटील पुन्हा एरंडोलला आले. काही दिवस घरी आराम केल्यानंतर त्यांनी पुन्हा आपला शेतातील दिनक्रम सुरू ठेवला. शेतात बैलांना चारापाणी करणे, फेरफटका मारणे, पाणी भरणे आदी दिनचर्या अनेक वर्ष तशीच सुरू आहे.

पंचाहत्तरीतही सामाजिक कामात अग्रेसर

सदाशिव पाटील हे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असून, एरंडोल येथील गुजर समाज मंडळाचे ते खजिनदार आहेत. शिवाय गावातील लग्नकार्य, सामाजिक कार्यक्रम यात त्यांची आवर्जून हजेरी असते. गरीब शेतकऱ्यांच्या घरी आकस्मिक हॉस्पिटल खर्च उद्भवल्यास सदाशिव पाटील हे त्यांच्या परीने आर्थिक मदत देखील करतात.

मध्यंतरी दोन जावयांचे आकस्मिक निधन झाले. हे दुःख देखील त्यांनी पचवले. आजही ते शेतात नियमित फेरफटका मारतात. नुकतीच वयाची पंचाहत्तरी ते आता पूर्ण करणार आहेत.

"कॅन्सर झाल्यानंतर वेळेत व व्यवस्थित उपचार करून दिनचर्या व्यवस्थित पाळणे गरजेचे आहे. कॅन्सर आजारात रुग्णासोबत कुटुंबीयांच्या आयुष्याची खरी कसोटी पणाला लागते. कुटुंबीयातील सर्वांनी एकत्र येऊन रुग्णाला मानसिक आधार दिल्यास तो लवकर बरा होऊन निरोगी आयुष्य जगू शकतो."- ज्योती शरद चौधरी, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT