Prashant Mahajan with cardamom variety banana. Ripe cardamom banana in the second photo. esaka
जळगाव

SAKAL Exclusive : इलायची केळीचा प्रयोग यशस्वी; तांदलवाडीत कापणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात लागवड होणाऱ्या आणि दिल्लीसह मुंबईत विकल्या जाणाऱ्या इलायची (इलक्की) केळीच्या लागवडीचा प्रयोग तालुक्यातील चार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. या केळीची कापणी सोमवारी (ता. २८) सुरू झाली आहे. या केळीला तब्बल पाच हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला. आगामी काळात तालुक्यात केळीची लागवड वाढविणार असल्याचे या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. (Cardamom banana experiment successful Harvesting begins in Tandalwadi Latest Jalgaon News)

तांदलवाडी (ता. रावेर) येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी प्रशांत महाजन यांच्या शेतात सोमवारी या केळीची कापणी सुरू झाली. याबाबत प्रशांत महाजन यांनी सांगितले, की केरळ आणि तमिळनाडूत या प्रकारच्या केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि ही केळी मुंबईतही मोठ्या प्रमाणात विकली जाते.

या केळीची मागणी पाहून आपणही आपल्या शेतात चार हजार केळी खोडांचे उत्पादन घेत आहोत. या केळीचे बियाणे खासगी विक्रेत्याकडून घेतले आहे. ‘ग्रँड नाइन’ या जातीसारखीच लागवड व उत्पादन प्रक्रिया आहे. प्रतिघडाचे वजन तुलनेने कमी म्हणजे १२ ते १४ किलो येते.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

माझ्याबरोबर तांदलवाडी येथील कृषिभूषण प्रेमानंद महाजन, युवा शेतकरी अभिजित महाजन, तसेच अटवाडा येथील निर्यातदार, युवा केळी उत्पादक शेतकरी विशाल अग्रवाल यांनीही या जातीच्या प्रत्येकी चार हजार केळी खोडांची लागवड केली आहे.

सध्या तांदलवाडी येथील केळीला दिल्ली बाजारपेठेत पाठविले जात आहे. ही पिकलेली केळी किरकोळ बाजारपेठेत १०० ते १५० रुपये किलोने विकली जाते. सामान्य केळीपेक्षा ही केळी अधिक गोड असते, म्हणून या केळीची मागणी व भावही जास्त असतो.

दक्षिण भारतातील ही केळी लागवड आता जळगाव जिल्ह्यातही यशस्वी झाली असल्याने आगामी काळात लागवड वाढविण्यात येणार असल्याचे प्रशांत महाजन यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT