Jalgaon Municipal Corporation Commissioner & staff
Jalgaon Municipal Corporation Commissioner & staff esakal
जळगाव

कॅरी बॅग कारखान्याचे गोदामच केले ‘सील’; महापालिका आयुक्तांची कारवाई

कैलास शिंदे

जळगाव : महापालिकेकडून (Jalgaon Municipal Corporation) शहरातील औद्यौगिक वसाहतीत (MIDC) ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरी बॅग (Carry Bags) तयार करणाऱ्या कंपनीचे गोदाम (Warehouse) ‘सील’ (Seal) करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी (municipal commissioner) सोमवारी (ता. ६) ही धडक कारवाई केली. (Carry bag factory warehouse sealed Action of Jalgaon Municipal Commissioner Jalgaon News)

महापालिका आयुक्त विद्या गायकवाड (Jalgaon Municipal Corporation Commissioner) यांनी सध्या महापालिकेत कामाचा जोरदार धडका लावला आहे. त्यांनी सोमवारी औद्यौगिक वसाहतीतील कॅरी बॅग बनविणाऱ्या कारखान्यावर थेट छापा टाकला. त्या ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरी बॅग मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने या कारखान्याच्या गोदामाची तपासणी केली. त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कॅरी बॅगचा साठा आढळून आला. त्या वेळी त्यांनी थेट गोदामच सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. या वेळी अधिकारी मनीष महाजन, अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर, आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे तसेच अतिक्रमणविरोधी पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्तांचे आवाहन

शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरी बॅगचा वापर कोणीही करू नये. ते पर्यावरणास हानीकारक आहे. या बॅग उत्पादन करणारे, विक्री करणारे तसेच त्याचा वापर करणारे यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. तसेच पालेभाज्या, फळे, इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही अशा बॅगा ठेवू नयेत, ज्या विक्रेत्यांकडे त्या आढळतील त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT