crime  esakal
जळगाव

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 8 जणांच्या विरोधात गुन्हा

आल्हाद जोशी

एरंडोल (जळगाव) : विवाह होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही, तोच माहेराहून नवीन घरासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करुन १९ वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरा, नणंद, मावस सासरा व मावस सासू अशा आठ संशयितांविरोधात विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांधीपुरा भागातील निकिता विजय नाईक (वय १९) यांचा विवाह सुनील सोपान घ्यार (रा. धोंडखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) याच्याशी ४ जून २०२१ ला उमरदे (ता. एरंडोल) येथे झाला होता. लग्नात निकिताचे वडील विजय नाईक यांनी अडीच लाख रुपये रोख, दागिणे, मूळ लावताना संसारापयोगी वस्तू दिल्या. विवाहितेचा पती सुनील घ्यार हा जळगावला वीज वितरण कंपनीत आहे. लग्नानंतर एक महिन्यांनी सासू आशाबाई सोपान घ्यार व नणंद सविता सोपान घ्यार हे तिला शेतीची कामे येत नाही यावरुन निकीताला त्रास देऊ लागले.

पती सुनील मारहाण करुन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तिने जळगाव येथे नवीन घर घेण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिला छळ होऊ लागला. याची माहिती निकिताने माहेरी आल्यानंतर वडिलांना दिली. त्यावर तिची समजूत घालून पुन्हा सासरी रवाना केले. मात्र, सासू आशाबाई घ्यार यांनी निकिताने माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली.

ऑगस्टमध्ये निकिता व पती सुनील घ्यार हे जळगावला राहण्यासाठी आले असता मावस सासू सुरेखा नामदेव घुगे, मावस सासरे नामदेव दगडू घुगे, छाया सुरेंद्र नाईक यांनी नवीन घरासाठी दहा लाखांची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने ९ जानेवारीला सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले.

याबाबत निकिता नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती सुनील घ्यार, सासरे सोपान घ्यार, सासू आशाबाई घ्यार, नणंद सविता घ्यार, मावस सासरे नामदेव घुगे, मावस सासू सुरेखा घुगे, मावस दीर सचिन घुगे, मावस सासू छाया नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT