Crime News
Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पातोंडा, मुंदखेडे येथे वीजचोराविरुद्ध गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील पातोंडा व मुंदखेडे खुर्द येथील दोन वीज ग्राहकांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Cases registered against electricity theft in Patonda Mundkhede jalgaon crime news)

तालुक्यातील मुंदखेडे खुर्द येथील प्रमोद तथा मंगेश अण्णा पाटील व पातोंडा येथील नीलेश बापू पाटील यांच्यावर वीजचोरी प्रकरणी कारवाई झाल्यावर विहीत मुदतीत वीजचोरीचे बिल भरले नाही म्हणून या दोन्ही वीज ग्राहकांवर महावितरणच्या पातोंडा कक्षाचे सहाय्यक अभियंता किशोर पाटील यांनी येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात वीजचोरीची फिर्याद देऊन गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहर व ग्रामीन भागात वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी नियमित वीजचोरी शोधमोहीम राबवत असतात.

गेल्यावर्षी पातोंडा(ता.चाळीसगाव) कक्षात १५९ वीजचोरांविरोधात कारवाई करण्यात आली असून ३८ लाख ५ हजार रुपये एवढ्या रकमेची वीजचोरीची बिले देण्यात आली आहेत, तसेच चोरीचे वीजबिल न भरणाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तरी अधिकृत नियमांप्रमाणे वीज वापर करण्याचे महावितरणमार्फत आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT