सर्व विद्यार्थ्यांना होस्टेलच्या तळमजल्यावरील बंकरमध्ये थांबवले
सर्व विद्यार्थ्यांना होस्टेलच्या तळमजल्यावरील बंकरमध्ये थांबवले sakal
जळगाव

चाळीसगाव : डोळ्यांसमोरच पडला आकाशातून बॉम्ब

आनन शिंपी - सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव: ‘युद्ध सुरू झाल्याचे समजल्यानंतर होस्टेल प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून होस्टेलमधील सर्व विद्यार्थ्यांना होस्टेलच्या तळमजल्यावरील बंकरमध्ये थांबवले. माझा लॅपटॉप मात्र रूममध्ये राहिल्याचे लक्षात आल्यानंतर तो आणण्यासाठी कशीबशी परवानगी मिळाली. तळमजल्यावरून वर रूममध्ये पोचल्यावर लॅपटॉप घेतला आणि सहज म्हणून खिडकीत डोकावले तर अवघ्या होस्टेलपासून पाचशे फुटांवर अचानक आकाशातून बॉम्ब पडला आणि मोठा स्फोट डोळ्यांसमोरच झाला.

आगीचे ते लोण आणि आकाशात पसरलेला धूर अजूनही डोळ्‍यांसमोरून गेलेला नाही, ही आपबीती कथन केली आहे, युक्रेनमधून चाळीसगावला सुखरूप घरी पोचलेल्या यश परदेशी या विद्यार्थ्याने. येथील घाट रोडवरील जैन स्थानकासमोरील रहिवासी तथा बोढरे (ता. चाळीसगाव) येथील पोलिसपाटील राजेंद्र परदेशी यांचा मुलगा यश हा ७ फेब्रुवारीला भारतातून युक्रेनमधील खार्किव राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.च्या शिक्षणासाठी गेला होता. युद्ध परिस्थितीमुळे तो नुकताच घरी आला. त्याने सांगितलेले त्याचे अनुभव थरकाप आणणारे आहेत.

यशने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की प्रवेशप्रक्रियेतील पंधरा दिवसांचा कालावधी गेल्यानंतर कॉलेज नियमित सुरू झाले. दोन दिवस सुरळीत गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी युक्रेन व रशियाचे युद्ध होत असल्याची माहिती महाविद्यालयातील काही प्राध्यापकांकडून मिळाली. ही चर्चा भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झाल्यानंतर प्रचंड भीती पसरली. अशातच २४ तारखेला होस्टेलच्या व्यवस्थापनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व विद्यार्थ्यांना होस्टेलच्या तळमजल्यावरील बंकरमध्ये आणले. साधारणतः तीनशेच्या जवळपास भारतीय मुले या बंकरमध्ये होती. सुरवातीचे तीन दिवस सुरळीत गेल्यानंतर चौथ्या दिवशी मात्र अन्न व पाण्याची कमतरता काही प्रमाणात भासू लागली. पास्ता, खिचडी, भात, बटाट्याची भाजी एवढाच काय तो मेन्यू मिळायचा. यादरम्यान युद्धाची भीषणता वाढल्यानंतर विद्यार्थी प्रचंड घाबरलेले होते.

अनेकांना तर रडूच आवरले जात नव्हते. अशात घरच्यांसोबतच बोलणे होत असल्याने दिलासा मिळत होता. १ मार्चला होस्टेलच्या प्रमुखाने सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सूचना दिली, की या ठिकाणी आता थांबणे सुरक्षित नसल्याने किव (युक्रेनची राजधानी) विमानतळावर रात्री दोनला निघावे लागणार आहे. रात्री युद्धाला विराम दिला जात असल्याने हीच वेळ योग्य होती. त्यानुसार, सर्व जण थोडेफार खाण्याचे पदार्थ घेऊन पायी निघाले. रात्री दोनला निघाल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्वांनी रेल्वेस्थानक गाठले.

स्थानिकांना प्राधान्य

किव रेल्वेस्थानकावरील पोलिस व कर्मचारी रेल्वेमध्ये बसण्यासाठी स्थानिक युक्रेन नागरिक, भारतीय विद्यार्थिनी, महिला व लहान मुले यांनाच प्राधान्य देत होते. काही भारतीय विद्यार्थ्यांनी कसाबसा मागच्या डब्यात प्रवेश मिळविला. युद्धमय परिस्थितीमुळे रेल्वे कमी वेगाने धावत असल्याने बारा तासांच्या प्रवासासाठी २४ तास लागले. ३ तारखेला दुपारी बाराच्या सुमारास रेल्वेगाडी लवीव स्थानकावर आली. तेथून पोलंडच्या सीमेपासून पाच किलोमीटर मागे टॅक्सीचालकाने सोडले. कारण, त्यापुढे त्याला प्रवेश नव्हता. त्यामुळे टॅक्सीने आलेले विद्यार्थी पायपीट करीत सायंकाळी पाचला चेक पॉइंटवर पोचले. हा संपूर्ण जंगलाचा परिसर असल्याने प्रत्येकाची कसून तपासणी करूनच त्याला सीमेपलीकडे जाऊ दिले जात होते. सर्व भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडने तीनच दिवसांचा तात्पुरता व्हिसा दिलेला होता.

दिल्लीत उतरल्याचा आनंद

पोलंडच्या सीमेवर भारतीय दूतावासाचे अधिकारी उभेच होते. या सर्वांनी आम्हा विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा दिला. खासगी बसने पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वांना नेले. त्या ठिकाणी सर्वांची चांगली व्यवस्था ठेवली. पोलंडमधील स्वामिनारायण मंदिर ट्रस्टने चहा, नाश्‍ता, जेवणाची उत्तम सोय केली होती. ५ मार्चला सायंकाळी इंडिगो विमानाने आम्ही दिल्लीसाठी रवाना झालो. दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर उतरताच आनंद गगनान मावत नव्हता. दिल्लीवरून लगेचच औरंगाबादची फ्लाइट होती. तेथून खासगी वाहनाने चाळीसगावला आलो. युक्रेन ते चाळीसगावपर्यंत एक रुपयादेखील भाडे लागले नाही, सर्व खर्च भारत सरकारने केल्याचे यशने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT