Snake esakal
जळगाव

‘मदाऱ्या’चे मन परिवर्तन करत सर्पमित्राने दिले नागाला जीवदान

विखरण येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र मुकेश सोनार यांनी हे काम केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विखरण (ता. एरंडोल) येथे मदारीकडून नाग ताब्यात घेऊन, त्याचे मनपरिवर्तन करून नागाला जीवदान देण्यात आले आहे. विखरण येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र मुकेश सोनार यांनी हे काम केले आहे. (Latest Marathi News)


काल (ता. १२) श्री. सोनार नाग वाचवण्यासाठी जात असताना एरंडोल शहरातील पुलावर एक मदारी सापांचा खेळ करताना दिसला. त्या व्यक्तीकडे सर्पमित्र सोनार यांनी विचारणा केली असता त्या मदारीकडे सापाचे टोपली त्याच्यामध्ये नाग जातीचा साप आढळून आला. त्याला समजावून त्याच्याकडून साप जमा करण्यात आला. जगदीश बैरागी यांनी सापाची तपासणी केली असता सापाला इजा पोचविलेली होती. अशक्त झालेला साप पाहून सर्पमित्रांच्या मनाला खूप दुःख झाले. पुन्हा या गारुड्याकडे साप असतील, असा विचार करत त्याच्याकडे अधिक तपासणी केली तेव्हा साप मिळून आले नाही.

सर्पमित्रांनी गारुड्याचा शोध घेतला त्याच्या घरी गेले आणि त्याच्याकडे अजून तपासणी केली असता त्याच्याकडे काही टोपल्या आढळल्या. परंतु त्या टोपल्यांमध्ये साप नव्हते. मोईदिन नजीब मदारी याच्याकडून बाकीच्या सर्व टोपल्या जमा करून घेतल्या. मदाऱ्याने या पुढे रबरी खेळण्यातले साप वापरुन जनजागृती करेल, असे आश्वासन दिले. स्वयंसेवक बाळकृष्ण देवरे, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, योगेश गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाग सुरक्षितस्थळी रवाना करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...

Crime: भयंकर! ५ रुपये खर्च केले म्हणून आई संतापली; चिमुकल्याला ३ दिवस घरात कोंडलं, नंतर तळव्यांना दिले चटके

Latest Marathi News Live Update : इराणविरोधातील लष्करी कारवाईवरून अमेरिकेत राजकीय वातावरण तापलं, काँग्रेसचा युद्धविरोधात ठराव

Koyana Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Akola News : आ. साजिद खान पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT