school
school sakal
जळगाव

जळगाव : ग्रामीण भागातील अडीच हजार शाळांचे वर्ग सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनाची तिसरी लाट आल्‍याने लागलीच शाळा बंदचा निर्णय झाला. परंतु, हा प्रादुर्भाव कमी होत असल्‍याने शाळा सुरू करण्याबाबत झालेल्‍या निर्णयानुसार आज (ता. २४)पासून जळगाव जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील २ हजार ४८७ शाळा सुरू झाल्‍या आहेत.

राज्‍यात कोरोनाचे रुग्ण डिसेंबरच्या शेवटच्या व जानेवारीच्‍या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण, मृत्यूदर कमी असल्‍याने शाळा सुरू करण्याची मागणी होऊ लागली होती. त्‍यानुसार राज्‍यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. परंतु, स्‍थानिक जिल्‍हा प्रशासनाच्‍या निर्देशानुसार आजपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्‍या.

दोन हजाराहून अधिक शाळा खुल्‍या

जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिली ते बारावीच्या २ हजार ४८७ शाळा सुरू झाल्‍या. यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ३ लाख ७५ हजार ४६१ एवढी आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३३ हजार २३५ आहे. यापैकी एकूण १ लाख ८९ हजार ४७ विद्यार्थी सोमवारी शाळेत आले होते.

शहरी भागात प्रतीक्षा

कोरोनाचा प्रार्दुभाव व बाधितांची आकडेवारी पाहता जिल्‍हाधिकारी यांनी केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. यामुळे सध्‍या तरी शहरी भागातील शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. यामुळे शहरी भागातील शाळांकडून आजपासून पुन्‍हा ऑनलाइन क्‍लास सुरू केले आहेत.

विद्यार्थी- शिक्षक कोरोनाबाधित

जिल्‍ह्यात कोरोना बाधितांचा संख्‍या वाढत आहे. यात विद्यार्थी व शिक्षकदेखील बाधित झाले आहेत. यामध्‍ये जिल्‍ह्यातील जि. प. प्राथमिक, खासगी प्राथमिक व माध्‍यमिक शाळांमध्‍ये मिळून ७१ शिक्षक तर माध्‍यमिक शाळेतील २१ विद्यार्थी कोरोना बाधित झालेले आहेत.

शाळा व विद्यार्थिसंख्‍या

शाळा हजर विद्यार्थी

जिल्‍हा परिषद प्राथमिक १ हजार ७१० ७७ हजार ८८६

खासगी प्राथमिक २३९ १५ हजार १७१

खासगी माध्‍यमिक ५३८ ९५ हजार ९९०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT