PWD
PWD esakal
जळगाव

बोदवडमध्ये स्वच्छतेला सुरवात; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल

सकाळ वृत्तसेवा

बोदवड (जि. जळगाव) : ‘बोदवडला स्वच्छ सर्वेक्षणाचे तीनतेरा’ या मथळ्याखाली आजच्या ‘सकाळ’मध्ये वस्तुनिष्ठ वृत्त झळकताच नगरपंचायतीने आज सकाळपासूनच शहरात स्वच्छतेला सुरवात केली. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण साचली होती, अशा ठिकाणी जेसीबीचा वापर करुन घाण उचलण्यात आली. यामुळे शहरवासीयांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले असून नगरपंचायतीने स्वच्छतेच्या या कामात सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला होता. नगरपंचायत प्रशासनाकडून स्वच्छतेवर मोठा खर्च करुनही जागोजागी घाण साचल्याचे चित्र दिसून येत होते. या संदर्भात शुक्रवारी (ता. २४) ‘सकाळ’ने छायाचित्रांसह वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत, नगरपंचायत प्रशासनाने आज शहरातील म्हसोबा मंदिराजवळ, उर्दू शाळेच्या बाजूचा परिसर तसेच प्रभाग सातमध्ये स्वच्छतेला सुरवात केली. या भागातील शौचालयाजवळ तसेच खुल्या जागेवर टाकलेला कचरा जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात आला. नगरपंचायतीने

शौचालयांची दुरवस्था

नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छतेचे काम सध्या हाती घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सार्वजनिक शौचालयांच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता केली जात असली तर आतील भागात मात्र अस्वच्छता ‘जैसे थे’ आहे. या शौचालयांमधील विजेचे बल्ब अक्षरशः चोरीला गेले आहेत. अनेक ठिकाणचे दरवाजे तुटलेले आहेत. उर्दू शाळेजवळच्या शौचालयाची तर अतिशय वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामासोबतच शौचालयांची देखील दुरस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

गटारींच्या स्वच्छतेची मागणी

सध्या पावसाळा सुरु असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी अनेक भागातील गटारी पाण्याने तुंबतात. एकीकडे खुल्या जागांची स्वच्छता होत असताना दुसरीकडे गटारींमधील घाण मात्र काढली गेलेली नाही. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने बऱ्याच भागातील गटारी तुंबलेल्या आहेत. पावसाळ्यात संभाव्य साथीचे आजार पसरण्याची भीती लक्षात घेता, स्वच्छतेच्या सुरु असलेल्या कामांसोबत गटारींमधील घाण काढून त्यांचीही स्वच्छता करावी, अशीही मागणी होत आहे.

घंटागाडीत कचरा टाकण्याचे आवाहन

शहरातील बहुतांश भागातील रहिवासी तसेच व्यावसायिक खुल्या जागांवर कचरा टाकतात. त्यामुळे घाण आणखीनच पसरते, त्यात पाऊस झाल्यास बऱ्याचदा दुर्गंधी देखील सुटते. त्यामुळे नागरिकांनी खुल्या जागांवर किंवा गटारींमध्ये घाण, कचरा न टाकता घंटागाडीत कचरा टाकावा असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT