जळगाव

भुसावळ रेल्वे रुग्णालयात जम्बो ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणार   ​

चेतन चौधरी

भुसावळ : येथील रेल्वे रुग्णालयात मागील वर्षीच्या तुलनेत कोविड रुग्णांसाठी ५० खाटा वाढविण्यात आल्या असून, आता ११० खाटा करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा बसविण्याचे काम रेल्वे रुग्णालयात युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती भुसावळ विभागाचे मंडळ रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी दिली. 

मंडल रेल्वे प्रबंधक गुप्ता म्हणाले, की नाशिकच्या धर्तीवर लवकरच भुसावळ स्थानकावरील वातानुकूलित प्रतीक्षालय सुरू करण्यात येईल. भुसावळ विभागातील एकूण सोळा हजार रेल्वे कर्मचाऱ्यापैकी फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम वेगाने सुरू असून, येत्या पंधरवड्यात सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल. 

विभागातील स्थानकांवर लिफ्ट 
एक एप्रिलपासून भुसावळ विभागातील स्थानकांवर उपलब्ध असलेल्या सर्व उदवहन कक्ष (लिफ्ट) व सरकते जिने सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच प्रशासन रेल्वे संग्रहालयासाठी लवकरच मोकळी जागा शोधणार आहे. यात मनोरंजनासाठी विविध प्रकारचे खेळ, रेल्वेबाबत माहिती देणारे व्हिडिओसह मनोरंजनात्मक विविध गोष्टी असतील, अशा प्रकारचे म्युझियम उभे करण्याचा विचार करत आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले. मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. अरुण कुमार यांनी संत्रसंचालन केले. 

कोरोनामुळे काही गाड्यांबाबत विचार 
संरक्षण क्षेत्रात विभागाचे कार्य प्रगतिपथावर असून, आतापर्यंत ३० रेल्वेगेट पूल बनवून बंद करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन रेल्वे गाडी भुसावळ विभागातून सोडण्याऐवजी काही प्रवासी रेल्वे गाड्या बंद कराव्या लागतात, की काय अशी शक्यता विवेक गुप्ता यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. 


चोवीस तास ऑक्सिजन निर्मिती 
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बऱ्याच रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत असून, ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी पडत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून रेल्वे हॉस्पिटलच्या परिसरात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामधून १०० बेडला २४ तास पुरेल इतका १५ दलघमी ऑक्सिजन २४ तासांत तयार केला जाणार आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT