जळगाव

जळगाव स्थिती भयावह; ऑक्सिजन, आयसीयू बेड, रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग 

सचिन जोशी

जळगाव: कोरोनाचा उद्रेक नागरिकांच्या जिवावर उठत आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेटिंगवर ठेवले जात आहे, तर मृतदेहांना अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागतेय... कोरोनाने उभे केलेले हे भयावह चित्र धडकी भरविणारे आहे. 

जळगाव शहरात तीन दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक असल्याने शहरातील सक्रिय रुग्ण कमी झाले असले तरी मृत्यू वाढले असून, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार २४ तासांत ३६ वर्षीय तरुणासह सात जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. 

जिल्ह्याचे चित्र विदारक 
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या तीव्रतेने विदारक चित्र निर्माण केले आहे. दहा दिवसांत तेथे ११ हजारांवर नवे रुग्ण आढळून आले असून, सक्रिय रुग्णांसह ऑक्सिजन व आयसीयूतील गंभीर रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत असून, ही प्रतीक्षा त्यांच्या जिवावर बेतत आहे. 

स्मशानभूमीतही ‘वेटिंग’ 
वाढत्या गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा जीव जात असून, जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दहा-बारापेक्षा अधिक मृत्यू होत आहेत. शुक्रवारी हा आकडा १५ वर गेला. गुरुवारी रात्री नेरीनाका स्मशानभूमीतील सर्व १२ ओट्यांसह खाली जमिनीवर सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते. तर त्यामुळे स्मशानभूमीचे प्रवेशद्वारच बंद करण्याची वेळ आली. प्रवेशद्वाराबाहेर मृतेदह वेटिंगवर होते. 

दिवसभरात सात जणांचा बळी 
जळगाव शहरात बळींची संख्या वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार २४ तासांत शहरातील ३६ वर्षीय तरुणासह सात जणांचा बळी गेला. आतापर्यंत शहरातील बळींचा आकडा ३६५ वर पोचला आहे. 

सक्रिय रुग्ण घटले 
दोन-तीन दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा थोडा जास्त आहे. सक्रिय रुग्ण घटले असून, त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी नवे २५२ रुग्ण समोर आले, तर दिवसभरात ३२० जणांना डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी तीन हजारांवर असलेली सक्रिय रुग्णसंख्या शुक्रवारी दोन हजार ७७५ पर्यंत घटली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

Solapur Crime:'साेलापुरात नवविवाहितेचा दहा लाख रुपयांसाठी छळ'; सात जणांवर गुन्हा दाखल, जाचहाट व छळ अन्..

छावणीच्या थकीत बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’; ‘इन्साफ कब मिलेगा’ म्हणत सत्ताधारीच अधिवेशनात आक्रमक !

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली

SCROLL FOR NEXT