जळगाव

जळगाव जिल्ह्यातील २८ खासगी हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण 

सचिन जोशी

जळगाव : दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सोमवार (ता. १)पासून सुरू होत आहे. त्यासाठी खासगी हॉस्पिटलचाही समावेश करण्यात आला असून, जळगाव शहरातील २१ रुग्णालयांसह जिल्ह्यातील २८ हॉस्पिटलमध्ये ही लस सशुल्क उपलब्ध होणार आहे. 
कोरोनाचा बीमोड करण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहिमेस १६ जानेवारीपासून सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कस, महसूल व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत असून, आता केंद्र सरकारने दुसरा टप्पा ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर केला आहे. 


यात ६० वर्षांवरील नागरिकांना सरकारी यंत्रणेतून मोफत, तर ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. शिवाय या दुसऱ्या टप्प्यात खासगी हॉस्पिटलमधून सशुल्क लस उपलब्ध असेल. त्यासाठी जिल्ह्यातील २८ हॉस्पिटलची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत संलग्न हॉस्पिटलचा प्रामुख्याने समावेश आहे. 

अशी आहेत हॉस्पिटल 
चाळीसगाव : शैलजा मेमोरिअल कृष्णा क्रिटिकल केअर सेंटर व बापजी जीवनदीप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 
भडगाव : विघ्नहर्ता हॉस्पिटल 
जामनेर : जी. एम. हेल्थकेअर हॉस्पिटल, कमल हॉस्पिटल 
चोपडा : श्री नृसिंह हॉस्पिटल 
भुसावळ : विश्‍वनाथ हॉस्पिटल, अष्टभुजा मंदिराजवळ, साईपुष्पा हॉस्पिटल यावल रोड, पुष्पा सर्जिकल टिंबर मार्केट 
जळगाव : जीवनज्योती कॅन्सर हॉस्पिटल, शाहू महाराज हॉस्पिटल, कांताई नेत्रालय, प्रकाश चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, गांधी हॉस्पिटल जिल्हापेठ, ऑर्किट हॉस्पिटल आर. आर. शाळेजवळ, अश्‍विनी हॉस्पिटल हौसिंग सोसायटी, डॉ. भंगाळे सर्जिकल, महाजन हॉस्पिटल ढाके कॉलनी, खडके हॉस्पिटल, भास्कर मार्केट, श्री साईलीला हॉस्पिटल, प्रतापनगर, सुलोचन रेटिना, भास्कर मार्केट, गायत्री हॉस्पिटल, राधाकृष्ण कॉलनी, संजीवन हॉस्पिटल, एम. जे. कॉलेजजवळ, धन्वंतरी हॉस्पिटल, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, श्री ॲक्सिडेंट व ट्रोमा केअर सेंटर, भिरुड हॉस्पिटल, आशीर्वाद ॲक्सिडेंट हॉस्पिटल. 

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil: काँग्रेस अनेकदा फुटली पण सडोलीचा पाटील हलला नाही... २० वर्षे एकहाती किल्ला लढवणारे पीएन कोण होते ?

Who is Dhangekar?: ‘धंगेकर कोण?, मी किंमत देत नाही’, उदय सामंत चिडले..

कराड-मलकापूर मार्गावर CNG गॅस गळती, वाहतूक खोळंबली.. नेमकं काय घडलं?

इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलने बुडवली RCBची बोट... एक रन काढण्यासाठी मोजले तब्बल २१ लाख

SCROLL FOR NEXT