जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरण थांबलेलेच; ३६ हजार कोविशिल्ड सोमवारी येणार

देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीकरणाची वेग मंदावला आहे. कोविशिल्ड लस गेल्या चार दिवसांपासून जिलह्यात उपलब्ध नाही. बुधवारपासून  शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे बंद आहेत. ग्रामीण भागातील काही लसीकरण केंद्रांत को-व्हॅक्सीन लसी उपलब्ध आहेत. त्याठिकाणी लसीकरण सुरू आहे. येत्या सोमवारी ३६ हजार ७५५ कोविशिल्ड लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्यात बुधवारअखेर कोव्हिशील्ड लसींचे दोन लाख चार हजार ३४० डोस आले होते. त्यातील एक लाख ९५ हजार ५४० डोस वापरले गेले. आठ हजार ८०० डोस गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर पाठविण्यात आले, तर को-व्हॅक्सिन लसींचे १८ हजार डोस आले आहेत. तेही वापरले गेले. आता तीन हजार ६८० को-व्हॅक्सिन लसींचे डोस आले आहेत. ज्यांनी को-व्हॅक्सिन लस अगोदर घेतली आहे त्यांनाच ते दिले जात आहेत. कोव्हिशील्ड लसीचे डोस संपल्यात जमा आहे. शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगर रुग्णालय व खासगी ठिकाणी सुरू असलेले लसीकरण बुधवारपासून बंद आहे. शासनाकडे एक लाख ३० हजार लसींची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना बाधीतांना वाचविण्यासाठी कोरोना लसीकरणास वेग वाढवावा लागेल. तरच रुग्णांना काही काळानंतर वाचविणे शक्य होईल. 

सोमवारी येणार लस

येत्या सोमवारी (ता.१२) कोविशील्ड लसीचे डोस जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहेत. मागणी १ लाख ३० हजारांची असली तरी सोमवारी ३६ हजार ७५५ लसी उपलब्ध होणार आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT