Cotton loaded in a truck to sell to traders was sold by driver on road at half price jalgaon crime news  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : पारोळा तालुक्यातील 3 शेतकऱ्याची 10 लाखात फसवणूक 

गुजरातच्या व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी ट्रकमध्ये भरलेला कापूस चालकाने रस्त्यात परस्पर अर्ध्या किमतीत विकला. या घटनेत शेवगे बुद्रूक (ता. पारोळा) येथील तीन शेतकऱ्यांची सुमारे दहा लाखांची फसवणूक झाली

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : गुजरातच्या व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी ट्रकमध्ये भरलेला कापूस चालकाने रस्त्यात परस्पर अर्ध्या किमतीत विकला. या घटनेत शेवगे बुद्रूक (ता. पारोळा) येथील तीन शेतकऱ्यांची सुमारे दहा लाखांची फसवणूक झाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ट्रकच्या नंबर प्लेटही बनावट असल्याचे उघड झाले आहे. (Cotton loaded in a truck to sell to traders was sold by driver on road at half price jalgaon crime news)

या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकासह ट्रान्स्पोर्ट मालकाविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.

शेवगे बुद्रूक (ता.पारोळा) येथील अशोक नध्थू पाटील, प्रल्हाद नध्थू पाटील, दिनेश एकनाथ पाटील या शेतकऱ्यांनी यंदा राज्यात कापसाला कमी भाव असल्याने तिघांनी मिळून गुजरात येथील कढी या ठिकाणी दोन पैसे जास्त मिळतील.

या आशेने एका ट्रकमध्ये कापूस भरून विकण्याचे ठरविले. त्यानुसार शनिवारी (ता.१३) जळगाव येथील हसीन रशीद खानुबेगवाला यांच्या आदर्श ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी दहा टायर असलेला ट्रक (जीजे ०२, एक्सएक्स १०७५) याला शेवगे बुद्रूक येथे कापूस भरण्यासाठी पाठविले होते.

त्यानुसार रविवारी (ता. १४) ट्रकमध्ये १३८ क्विंटल कापूस भरल्यानंतर वाहन गुजरात राज्यात कडी येथे रवाना झाले.

परंतु सोमवारी (ता.१५) शेतकऱ्यांनी ट्रकचालकाशी संपर्क केला असता चालकाचा संपर्क तुटला. त्याने आपला मोबाईल बंद केला होता. याबाबत शेतकऱ्यांनी ट्रान्स्पोट मालकाशी संपर्क साधला व वाहनचालकाचे नाव, परवाना याबाबत माहिती घेतली.

त्यानुसार त्या क्रमांकाचा ट्रक भावनगर या ठिकाणी त्यांच्या मालकाच्या घरी उभा आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा कापूस भरलेला नाही, असे चौकशीनंतर ट्रान्स्पोट मालकाला कळले.

त्यानंतर शेतकऱ्यांना सांगण्यात आले, की अज्ञात चालकाने वाटेत कुठेतरी ट्रकमधील १३८ क्विंटल कापूस विक्री करून रुपये नऊ लाख ९६ हजार १२० स्पये किमतीचा कापूस विकून पसार झाला.

या ट्रान्स्पोर्ट मालकाने पाठविलेला ट्रक अज्ञात चोरट्यांचा होता. वाहनाची नंबर प्लेट बदलून शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन ते पसार झाले. या प्रकरणी सोमवारी (ता. १५) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT