जळगाव

कोविड सेंटरमध्ये मद्यपीने केले आत्महत्या नाटक; आणि नंतर महापौरांचा दणका !

भूषण श्रीखंडे

जळगाव : शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू, गुटखा न दिल्यास आत्महत्येची धमकी देणाऱ्याला महापौर भारती सोनवणे यांनी चांगलाच दम दिला. मद्यपीकडून दारूच्या ४ बाटल्या, गुटखा जप्त करण्यात आला आहे. महापौरांच्या सुचनेनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
 

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत असून महापौर सौ.भारती सोनवणे रुग्णांची विचारपूस करीत असतात. बुधवारी अविनाश पाटील नामक एक मद्यपी गोंधळ घालत असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांना मिळताच त्या तात्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विजय घोलप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापौरांनी केली कानउघडणी
मनपाच्या कोविड केअर सेंटर इमारत क्रमांक ४ मध्ये आईसह उपचारार्थ दाखल असलेल्या अविनाश पाटील या तरुणाने बाहेरून दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. तसेच मला दारू आणि गुटखा न दिल्यास मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी तो देत होता. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्याला खाली बोलवत चांगलीच कानउघडणी केली. तसेच त्याच्या ताब्यातील ४ दारूच्या बाटल्या आणि गुटखा देखील काढून घेतला.

गुटखा घेऊन पळाला, खोलीला लावली कडी
महापौर सौ.भारती सोनवणे या मद्यपीला खडसावत असतानाही त्याने मद्यप्राशन केलेले होते. महापौरांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्याने टेबलावर ठेवलेली गुटख्याची पुडी उचलून वर पळ काढला आणि स्वतःच्या खोलीत जात आतून कडी लावून घेतली. मद्यपी इतक्यावरच थांबला नाही तर खोलीतून तो पुन्हा पुन्हा आत्महत्येची धमकी देत होता.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या अविनाश अरुण पाटील याच्यासह कोविड केअर सेंटरच्या बाहेर जाऊन परत येणाऱ्या गजानन विजय काकडे, प्रसन्न प्रदीप सराफ यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात डॉ.विजय घोलप यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT