crime blackmailing Marriage women offensive images instagram
crime blackmailing Marriage women offensive images instagram sakal
जळगाव

आक्षेपार्ह चित्रण करून विवाहितेचे ‘ब्लॅकमेलिंग’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : इन्स्टाग्रामवर मैत्री करून ३३ वर्षीय विवाहितेवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. एवढेच नाही, तर हॉटेलमध्ये काढलेले व्हिडिओ दाखवून ५० हजारांची मागणी केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेली ३३ वर्षीय विवाहिता ब्यूटिपार्लरचा व्यवसाय करून संसाराला हातभार लावते. त्यांचे इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर खाते आहे.

या खात्यावरून संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी (वय ४८, रा. जळगाव) याच्याशी ओळख झाली. इन्स्टाग्राम मैत्री झाल्याने फेशियल करण्याचे कारण दाखवून विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश चौधरी घेऊन गेला.विवाहितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा फिरवून आणण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये घेऊन गेल्यावर पुन्हा अत्याचार केला. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ बनविला. व्हिडिओ बनवून विवाहितेकडे ५० हजारांची मागणी केली. पैसे दिले नाही, तर तुझ्या पतीला दाखवले, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले. प्रकरण चिघळत चालले असल्याने तिने पतीला विश्वासात घेत सर्व सांगितल्याने पतीनेही तिची साथ दिली. सहाय्यक निरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहे.

पतीकडे पैशांची मागणी

पीडितीने संशयित आरोपी गणेश चौधरी याची समजूत घालण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पैशांसाठी विवाहितेला मारहाण करून तिचा छळ चालवला होता. पती तिची मदत करत असल्याचे कळताच तिच्या पतीकडून फेसबुकवरून पैशांची मागणी केली. प्रकरण सहन करण्यापलीकडे गेल्याने अखेर पीडित कुटुंबाने पेालिस ठाणे गाठले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT