जळगाव

मुलगा बरा होण्यासाठी दुसऱ्याच्या मुलाचा दिला नरबळी..तब्बल एका वर्षानंतर दाखल झाला गुन्हा

योगेश महाजन

अमळनेर : नेहमी आजारी असलेला आपला मुलगा बरा व्हावा म्हणून गावातीलच 10 वर्षांच्या बालकाला शेतात जेवणाला बोलावून त्याला धरणात बुडवत नरबळी दिल्याची धक्कादायक घटना  देणार्‍या तालुक्यातील डांगर बुद्रुक येथील 16 जणांवर अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने एका वर्षांनी गुन्हा दाखल झाला आहे.

डांगर बुद्रुक येथील इंदल हिरामण चव्हाण यांचा मुलगा झिंग्या हा नेहमी आजार राहत होता. त्यामुळे मुलगा बरा व्हावा म्हणून इंदल याने जादू जादूटोण्यावर विश्वास ठेवून शेतात चावदस निमित्त 7 एप्रिल 2020 रोजी डाळ बट्टीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. या जेवणासाठी त्यांनी गावातील सुभाष बसराज राठोड (वय 39) यांचा मुलगा सुदर्शन सुभाष राठोड (वय 10) याला निमंत्रण दिले होते. त्यानंतर त्याला बोलावून घेण्यासाठी झिंग्याला पाठवले होते. तो सुदर्शन याला घरून बोलावून घेऊन गेला. त्यानंतर सुदर्शन याच्या कपाळावर टिळा लावून गळ्यात मिरची, लिंबू घालून सुदर्शन रोहिदास चव्हाण यांच्या शेताजवळील धरणात घेऊन गेले. त्याला धरणात बुडवून मारले.
 

यांच्याविरुध्द झाला गुन्हा दाखल

याप्रकरणी आरोपी रोहिदास हिरामण चव्हाण, मनीराम हिरामण चव्हाण, इंदल हिरामण चव्हाण, योगेश मनीराम चव्हाण, रामसिंग नंदा चव्हाण, दादू रोहिदास चव्हाण, निलेश रोहिदास चव्हाण, सोनी रोहिदास चव्हाण, निकिता इंदल चव्हाण, चंद्रकला मनीराम चव्हाण, तुळसाबाई रोहिदास चव्हाण, भारती इंदल चव्हाण, ताई रामसिंग चव्हाण, शंकर रामसिंग चव्हाण, नवसाबाई हिरामन चव्हाण (सर्व रा. डांगरी) आणि ज्ञानेश्वर चव्हाण (रा. रणाईचे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गंभिर शिंदे करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ५ वर्षांत अब्जावधी लोकांकडे असेल स्वतःचा AI एजंट; मार्क झुकरबर्गचा मोठा दावा!

Mumbai Crime: धक्कादायक! अकाली बाळाला जन्म दिला आणि कचरापेटीत टाकलं, १९ वर्षीय अविवाहितेचं कृत्य

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Ajinkya Rahane: रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा भावुक; 'एकाच ड्रेसिंग रूममध्ये अनेक वर्षे...' म्हणत व्यक्त केल्या भावना म्हणाला...

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

SCROLL FOR NEXT