CRIME 
जळगाव

'तु माझ्या शिवाय कोणाचीच होवू शकत नाही'; असे म्हणत, तरुणीवर चाकुने केले वार

दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून मेहूणबारे(ता.चाळीसगाव) येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने 18 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरूणीचा भाऊही जखमी झाला आहे.भाऊ-बहिणीवर हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत आधार चौधरी याच्या विरूद्ध मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथील 18 वर्षीय पीडित तरूणी ही आई वडिल व भावासह राहते. तरुणी ही चाळीसगाव येथील एका महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहे.सुमारे 10 वर्षापूर्वी या पिडीत तरुणीच्या घरासामोर राहणारा प्रशांत चौधरी याच्याशी तिची ओळख झाली.

माफी मागून बाहेरगावी गेला

प्रशांतने या ओळखीतून त्याने तरुणीला लवशीप ठेवण्याची विनंती केली.मात्र तरुणीने याला नकार देताच तो वारंवार त्रास देवू लागला.हा प्रकार पीडित तरूणीने आपल्या आई वडिलांमार्फत प्रशांतच्या आई वडिलांना सांगितला.झाल्या प्रकाराची त्यांनी माफी मागून प्रशांतला बाहेरगावी पाठवून दिले होते. तेव्हापासून बोलणे चालणे बंद होते.

शेवटच भेट, तुझ्यासाठी गिप्ट आहे..

पीडित तरुणीच्या आईच्या मोबाईलवरून प्रशांतने तरुणीशी संवाद साधून माझे लग्न ठरले असून मला तुला शेवटचे भेटायचे आहे, तुला एक गिफ्ट द्यायचे असून यानंतर तुला भेटणार नाही असे सांगितले. तरुणीने त्यास नकार दिला. 

आणि चाकू घेवून घरात घुसला
प्रशांत चौधरी या तरुणाने सोमवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास पीडित तरुणी घरात हातात चाकु घेवून घुसला शिवीगाळ करीत तु माझ्या शिवाय कुणाचीच होवू शकत नाही असे सांगत चाकू तरुणीवर वार केले. तरुणीने आरडाओरड केल्याने.तरुणीचा भाऊ धावत आला असता बोटाला चाकू लागला. पीडितेचे आईवडिल धावत येताच प्रशांत हा पळून गेला. 

पोलिसात गुन्हा दाखल

प्रशांत चौधरी रा. याच्या विरोधात तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अरुण पाटील हे करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT