जळगाव

‘अंकल रायसोनी ॲन्ड गँग’ला सर्व आरोप अमान्य; राज्यभर ८१ गुन्हे !

रईस शेख

जळगाव  : जळगाव मुख्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट पतसंस्थेच्या पुण्यातील चार आणि पाचोऱ्याची एक अशा पाच शाखांत १५ कोटींचा अपहार झाल्याप्रकरणी दाखल खटल्यात कामकाजाला सुरवात झाली. संस्थेचे सर्वेसर्वा प्रमुख अंकल ऊर्फ प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संचालकांना त्यांच्यावरील आरोप न्यायालयात वाचून दाखविण्यात आले. मात्र, अंकल रायसोनी ॲन्ड गँगने या सर्व आरोपांचा न्यायालयासमोर इन्कार केला आहे. 

पुण्यातील राजगुरूनगर, शिवाजीनगर, इंदापूर व तळेगाव दाभाडे, तसेच पाचोरा या पाच शाखांतील ठेवीदारांच्या ठेवींचा गैरव्यवहार, अफरातफर प्रकरणात जिल्‍हा न्यायालयात न्या. आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू आहे.

विविध पोलिस ठाण्यांत दाखल सात गुन्ह्यांमध्ये प्रमोद रायसोनीसह १४ संचालकांवर सीआयडीतर्फे मागील महिन्यात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. जिल्हा कारागृहातील बंदिवान प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनींसह १४ संशयित संचालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्यांच्यावर असलेले आरोप न्यायालयाने त्यांना वाचून दाखविले. त्यावर सर्व आरोपींनी आरोप फेटाळून लावले. बीएचआर प्रकरणी मंगळवारी एकूण पाच खटल्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या १४ आरोपींवर सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर खटला सुरू होण्यासाठी आरोप ठेवण्यात आला होता. 

दरम्यान, पाच शाखांमध्ये अपहार झाल्याचे पुरावे आणि उपलब्ध दस्तऐवजावरून स्पष्ट होत असून, दोषारोप ठेवताना न्यायालयाने संशयितांची कुंडलीच रकमांच्या स्वरूपात मांडली. सरकार पक्षातर्फे जिल्‍हा सरकारी अभियोक्ता अॅड. केतन ढाके, बचाव पक्षातर्फे ॲड. अकील इस्माईल यांनी कामकाज पाहिले. 

या शाखा असा अपहार 
* राजगुरूनगर (पुणे) : २ कोटी ३० लाख 
* शिवाजीनगर (पुणे) : ७ कोटी ५ लाख ६ हजार ६७० 
* इंदापूर (पुणे) : ४ कोटी ७७ लाख ९३ हजार ३९४ 
* तळेगाव दाभाडे (पुणे) : ४० लाख ५७ हजार ३०० 
* पाचोरा : ८९ लाख १८ हजार ३३८ 
** एकूण : १५ कोटी ४२ लाख ७४ हजार ७०२ रुपये 


राज्यभर गुन्ह्यांची व्याप्ती 
बीएचआर प्रकरणी राज्यभरातील ८१ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यात अमरावती, परभणी, लातूर, सांगली, लातूर व पुणे येथे दाखल सात गुन्ह्यांचादेखील समावेश असून, जळगाव न्यायालयात या गुन्ह्यात दोषारोप सादर झालेला आहे. बीएचआरमधील अपहार प्रकरणात राज्यभरात दाखल गुन्ह्यांची सुनावणी जळगाव न्यायालयात सुरू आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT