Crop overturned by storm
Crop overturned by storm  esakal
जळगाव

Jalgaon News : वादळी तडाख्याने अडीच कोटींचे नुकसान; रब्बी पिकांसह केळी उद्ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव ) : तालुक्यात १८ मार्चला झालेल्या वादळी पावसाच्या (Rain) तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी व केळी पिकांचे सुमारे ३४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा वस्तुनिष्ठ पंचनामा शासनाला सादर करण्यात आला आहे. (Damage of 2 5 crore of rabi and banana crop due to storm rain jalgaon news)

रावेर तालुक्यात ४४ गाव शेती शिवारात वादळी पावसाच्या तडाख्यामुळे केळी व गहू, हरभरा, मका ही रब्बी पीके जमीनदोस्त होऊन नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाकडून २० मार्चपासून वस्तुनिष्ठ नुकसानीच्या पंचनाम्यास सुरुवात झाली होती. आज नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला.

पीकनिहाय शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र व नुकसान असे :

मका : शेतकरी २७५, बाधीत क्षेत्र -१६०.८० हेक्टर, नुकसान -९६ लाख, ४८ हजार रुपये.

गहू : शेतकरी -८३, बाधित क्षेत्र -५३.८८ हेक्टर क्षेत्र, नुकसान -३२ लाख,३२ हजार, ८०० रुपये.

हरभरा : शेतकरी - १५५, बाधित क्षेत्र -११८.१५ हेक्टर क्षेत्र, नुकसान - ७१ लाख ३७ हजार रुपये.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

केळी : शेतकरी -१८, बाधित क्षेत्र -८.२० हेक्टर क्षेत्र, नुकसान - ३६ लाख ४० हजार, ४०० रुपये.

५३१ शेतकऱ्यांच्या ३४१.८३ हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या रब्बी व केळी पिकाचे एकूण २ कोटी ३६ लाख, ५८ हजार ६०० रुपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

मागील भरपाई अद्यापही नाही

मागील वर्षी वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. सुमारे दीड हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळाली नाही. मागील व १८ मार्चला झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT