Jalgaon Unseasonal Rain Damage esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain Damage: तोंडापूर ला अवकाळी पावसाने गहु व मका चे नुकसान

तोंडापूर सह परिसरात बुधवारी (ता. १०) झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे गहू आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तोंडापूर सह परिसरात बुधवारी (ता. १०) झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे गहू आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले. उभे पीक पिके आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हात हिरावला गेल्याने शेतकरी चिंतातूर आहे. (Damage to wheat and maize due to unseasonal rains jalgaon news)

तोंडापूर सह परिसरात मंगळवारी रात्री पासून जोरदार वाऱ्यासह पावसाळी वातावरण आहे. अशातच काल सकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले.

मोठ्या मेहनतीने वन्यप्राणी पासून वाचवलेले गहु मका पीक वाऱ्यामुळे व पावसामुळे आडवे झाले असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तोंडापूर शिवारात राम भाऊ अपार यांच्या शेतातील एक एकर मका पीक पावसामुळे व जोरदार हवेने आडवे झाले.

भारुडखेडा शिवारात गट क्रमांक १०७ मधील शिवाजी श्रावण राऊत व राजू राऊत अनिल राऊत तीन शेतकऱ्यांच्या तीन एकर श्रेत्रातील गहू कोवळ्या स्थितीत आडवा झाले.

कुंभारी बुद्रुक येथील सायनाबाई उत्तम पाटील यांच्या शेतातील गव्हाच्या पिकाचे अवकाळी पावसाने आडवे झाले आहे.

खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहु हरभरा मका ज्वारी पिकाची लागवड केली मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने पुन्हा शेतकरी वर्गाच्या नशिबी नुकसानच आले.

शेतकरी संकटातून बाहेर निघत नसल्याने कृषी विभागाच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT