Devendra fadanvis Criticize maha Vikas Aghadi CM eknath shinde shiv sena dhule
Devendra fadanvis Criticize maha Vikas Aghadi CM eknath shinde shiv sena dhule  sakal
जळगाव

राज्यात गदा अन्‌ धनुष्यबाण आपलाच - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

धुळे : ‘‘राज्यात गदा चालविल्याने सत्तापरिवर्तन घडले. आता गदा चालविण्याची गरज नाही. कारण आता हनुमान चालिसा म्हणण्यावर कुठलीही बंदी नाही. त्यामुळे आता गदा पूजेसाठी वापरावी. शिवाय, धनुष्यबाणही आपलाच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाणासह स्वीकारले आहे,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.

दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील दादासाहेब रावल उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शनिवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कार्यकर्त्यांनी चांदीची गदा आणि धनुष्यबाण देत स्वागत केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणाले, की धनुष्यबाण नेमका कुणाचा? हा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. सद्यःस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे संख्याबळ पाहता धनुष्यबाण शिंदे यांच्याकडेच राहील.

राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही. राज्याच्या जडणघडणीसह विकासाच्या वाटचालीत मराठी माणसाचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे जगभरात मराठीचे नाव पोहोचले आहे. राज्याच्या विकासात इतरांचाही सहभाग आहे. म्हणून मराठी माणसाचे महत्त्व कमी होत नाही. एखाद्या कार्यक्रमात अतिशयोक्तीच्या शब्दांच्या वापरातून भाषण करणे गरजेचे असते. राज्यपालांनी बहुधा त्या हेतूने वक्तव्य केले असावे. कुणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नसावा, असे वाटते. राज्यपालांच्या मनात मराठी माणूस व राज्याबद्दल आकस नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT