kunal patil sakal
जळगाव

धुळे तालुक्याला २९ कोटी २१ लाख प्राप्त ; कुणाल पाटील

आमदार कुणाल पाटील : अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई; लवकरच मदतनिधी खात्यात

सकाळ वृत्तसेवा

धुळे : सप्टेंबर-२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नुकसान भरपाईपोटी २९ कोटी २१ लाख ८० हजार रुपये मंजूर झाले. या मदतनिधीचे वाटप करण्याचा आदेशही प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतनिधी जमा होईल, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली.

५ ते १३ सप्टेंबर-२०२१ धुळे जिल्हयात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. या नुकसानीची दखल घेत आमदार श्री. पाटील यांनी तातडीने पाहणी केली होती. तसेच पंचनामा करून नुकसानीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दरम्यान, धुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन मदतीची मागणीही केली होती. या पाठपुराव्यामुळे धुळे तालुक्यातील एकूण ४७ हजार २२७ शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २१ लाख ८० हजार रुपये मदत निधी प्राप्त झाला. हा निधी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ या मदतीचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत, असे आमदार श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT