जळगाव

जळगाव : जिल्हा बँक अध्यक्षपदाचा पेच, अंतिम निर्णय पवारांकडे

खडसेंच्या नेतृत्वात आज होणार बैठक : नाव वरिष्ठांकडे पाठविणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणीत सहकार पॅनलला महाविकास आघाडी प्रणीत सहकार पॅनलला २१ पैकी २० जागा मिळाल्या आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक ११ जागा मिळाल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडे जाणार आहे. अध्यक्ष निवड स्थानिक स्तरावर करावी, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कळविले आहे. यात गुलाबराव देवकर यांचे नाव निश्‍चित होते. मात्र, अन्य दावेदारही पुढे आल्याने पेच निर्माण झाला आहे. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते शरद पवार घेतील, असे सांगितले जात आहे.

स्थानिक स्तरावर निर्णय घ्या : जयंत पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रसेचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सोमवारी (ता. २९) जळगावला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नास आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी त्यांची भेट घेतली. जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निर्णयावर चर्चा केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवार निवडीचा विषय तुम्ही स्थानिक स्तरावर घेतला आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीचा निर्णय स्थानिक स्तरावर एकमताने घ्या, असे सूचविले असल्याचे सांगण्यात आले. गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन उपस्थित होते.

वरिष्ठ स्तरावरून नावाचा निर्णय

जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले, की जयंत पाटील यांनी अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्याचे सांगितले आहे. याबाबत आपण एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले, की आपण स्थानिक स्तरावर बैठक घेऊन नाव निश्‍चित करू आणि ते वरिष्ठांना कळवू. तो जो निर्णय घेतील, त्यानुसार अध्यक्ष जाहीर करू.

आज होणार बैठक

जिल्हा बँक अध्यक्षांची निवड शुक्रवारी (ता. ३) होणार आहे. त्यामुळे नाव निश्‍चित करण्यासाठी गुरुवारी (ता. २) बैठक होणार आहे. याबाबत ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले, की बैठक अद्याप निश्‍चित झालेली नाही. मात्र, गुरुवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात नवनिर्वाचित संचालकाची बैठक पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली होईल. तीत याबाबत चर्चा होईल.

यांचीही नावे पुढे

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्या नावावर एकमत होण्याचीही शक्यता आहे. मात्र, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. संचालकपदाची हॅटट्रिक करणारे संचालक संजय पवारही दावेदार आहेत. जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे या पदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. शिवाय अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही इच्छा दर्शविली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी आपणही या पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याची माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT