Jalgaon: Speaking at the BJP meeting on Sunday, Dr. Vijayakumar Village. Neighbors Girish Mahajan, MLA Suresh Bhole, MLA Sanjay Savkare etc. esakal
जळगाव

BJP Metting News : स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकींसाठी सज्ज राहा : डॉ. विजयकुमार गावित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेसह नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

त्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देऊन निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन मंत्री तथा भाजपचे जिल्हा प्रभारी डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. (Dr. Vijaykumar Gavit say Be prepared for local government elections Organizational meeting of BJP Jalgaon News )

आगामी निवडणुकांच्या पाश्‍र्वभूमीवर रविवारी (ता. २८) झालेल्यां भाजपच्या संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते.

व्यासपीठावर ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

बैठकीत डॉ. गावित यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक कार्यावर भर देण्याचे आवाहन केले.

येणाऱ्या सर्व निवडणुकीत जिंकण्याच्या दृष्टीने आतापासून तयारीला लागण्याची गरज आहे. प्रत्येक बूथ स्तरापर्यंत आपले संघटन मजबूत झाले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोचावे. संघटन बांधणीशिवाय पक्ष बांधणी होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘मी’पणाचा नाश होतो : महाजन
बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री महाजन म्हणाले, की राजकारणात अहंकार जास्त काळ टिकत नाही. जे ‘मी’ म्हणत होते ते आज कुठेच राहिले नाहीत. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून पक्षासाठी काम करायला हवे.

निवडणुका कार्यकर्त्यांच्याच बळावर जिंकता येतात. त्यामुळे आपले संघटन मजबूत व्हायला हवे, असे आवाहन महाजन यांनी केले. अजय भोळे, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, डॉ. राधेश्‍याम चौधरी, मधू काटे, नितीन इंगळे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Nursing COllege : बारामतीतील नर्सिंग महाविद्यालयासाठी 55 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता....

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

SCROLL FOR NEXT