An episode from the play 'She' performed at the State Drama Competition on Friday. esakal
जळगाव

Rajya Natya Spardha 2023 : ‘ती’च्या व्यथेवर भाष्य करणारे नाट्य

सकाळ वृत्तसेवा

Rajya Natya Spardha 2023 : शहर असो किंवा गाव, आजच्या तरुणी कुठेही सुरक्षित नाहीत. मग मनात राहून राहून एकच प्रश्न निर्माण होतो, की याला जबाबदार कोण? सरकार, पोलिस, त्यांच्या घरचे की खुद्द तरुणी? मुलींच्या सुरक्षिततेबाबत व ह्यूमन ट्रॅफिकिंगवर आधारित असलेले नाटक ‘ती’ हे विभावरी मोराणकर लिखित व प्रांजल पंडित दिग्दर्शित नाटक साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले.(drama commenting on pain of Ti in rajya natya spardha 2023 jalgaon news)

स्त्री ही स्वभावतःच सोशिक, घाबरट, भिडस्त असल्याने तिच्यावर अत्याचार केला तर ती आवाज उठवणार नाही, अशी खात्री असे कृत्य करणाऱ्यांना वाटते. विभावरी मोराणकर यांनी स्त्री ही घरच्यांच्या, नातेवाइकांच्या दावणीला बांधलेली सोशिक गाय असते, हा धागा धरून प्रत्यक्ष काकानेच वेश्या व्यवसायात ढकलेल्या तरुणीवर कथानक सादर केले.

आव्हानात्मक विषयावर सादरीकरण करण्यासाठी आवश्यक ती मेहनत दिग्दर्शिका प्रांजल पंडित यांनी घेतल्याचे जाणवत होते. फक्त काही प्रसंग अनावश्यक सिनेमॅटिक करण्याच्या नादात भडक वाटले.

हीना (विशाखा सपकाळे) हिला तिची आई काकाला दत्तक देते. मात्र काका तिला विकून वेश्या व्यवसायात ढकलतो. त्यानंतर एका बसस्टॉपवर गिऱ्हाइकाची वाट पाहत असताना हीनाची कहाणी प्रेक्षकांना कळते. शेवटच्या प्रसंगात बसस्टॉपवर असलेली म्हातारीच तिची आई असल्याचा खुलासा होतो. आई तिला घरी परत बोलवते; पण हीना त्यास नकार देते व अखेरीस बसस्टॉपवर एकटीच उरते.

अभिनयात विशाखा सपकाळे यांनी केलेली हीनाची भूमिका, तसेच त्यांना समर्थ साथ मिळाली ती फटका (कुणाल दाभाळे), लक्ष्मी (रोहन चव्हाण), विकास (अजय पाटील), मिया (प्रदीप भोई) यांनी यांसह यात म्हातारी (मृदुला बारी), शब्बो (भाग्यश्री भालेराव), दीपा (प्रियंका सनान्से), अक्का (प्रांजल पंडित), मुलगी (आशिता भगत, रुद्राक्षी पाटील), मुलगा (प्रणव रिळके) यांनी दिली.

तांत्रिक बाजूत संजना मोरे (प्रकाशयोजना) प्रसंगांना उठाव देणारी आणि शॅडो लाइटचा उत्तम वापर करणारी, संचित सपकाळे (पार्श्वसंगीत) प्रसंगांना प्रभावी करणारे, तर संकेत माळी (रंगभूषा), अर्चना माळी (रंगभूषा) नाट्यास उपकारक व साजेशी होती, तर चिराग भालेराव (नेपथ्य) सूचक होते. चंद्रकांत सुरवाळे, रोहित ठाकरे यांची रंगमंच व्यवस्था होती.

एका आव्हानात्मक विषयावरील नाट्य सादर केल्याबद्दल साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगरच्या कलावंत व तंत्रज्ञांचे मनस्वी अभिनंदन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Latest Maharashtra News Updates : उबाठा शिवसेना-मनसेचे खासदार दुबे आणि आमदार गायकवाड यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन

Maharashtra Assembly Session: 'ओम फट स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

Virar News : मीरा भाईंदरमधील मराठीच्या आंदोलनापूर्वीच वसईतील मनसेच्या नेत्यांना अटक

SCROLL FOR NEXT