जळगाव

Nanded Hospital Deaths : महाजन, मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा : खडसे

सकाळ वृत्तसेवा

Nanded Hospital Deaths : नांदेड येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी तेथील पालकमंत्री गिरीश महाजन व विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. (eknath khadse statement about mushrif mahajan resign in Nanded Hospital Deaths jalgaon news)

एकनाथ खडसे म्हणाले, की नांदेड येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. उपचाराअभावी रुग्ण दगावणे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. अगोदरच राज्यात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. शासन त्या बाबत गंभीर नाही. त्यात आता नांदेड येथे बालकावर उपचार करण्याचा हलगर्जीपणा करणे, हा निष्क्रियतेचा कळस झाला आहे.

राज्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा शासनाकडून न होणे हीसुद्धा अत्यंत गंभीर बाब आहे.

याला माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ जबाबदार आहेत.

महाजन यांनी पालकमंत्री म्हणून किती वेळा या रुग्णालयाला भेट दिली? गेली पाच वर्षे तेच वैद्यकीय शिक्षणमंत्री होते, त्या वेळी त्यांनी काय केले, असा प्रश्नही निर्माण होत आहे. नैतिकता ठेवून दोघांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT