Eknath Khadse esakal
जळगाव

खडसेंचा विधिमंडळापर्यंतचा मार्ग संघर्षाचाच!

राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एकनाथ खडसेंना विधान परिषदेत उमेदवारीची संधी मिळालीय.

सकाळ वृत्तसेवा

राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) विधान परिषदेत उमेदवारीची संधी मिळालीय.. पक्षनिहाय संख्याबळानुसार खडसे आमदार होतीलही, पण.. त्यांचा विधिमंडळापर्यंतचा मार्ग आणि विधिमंडळाील प्रवेशानंतरचा पुढचा प्रवास खडतर व संघर्षाचाच असेल, हेदेखील नाकारून चालणार नाही.

फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिपदाचा व नंतर पक्षातच अन्याय होत असल्याच्या भावनेतून भाजपचा त्याग केल्यानंतर खडसेंना राजकीय पुनर्वसनासाठी जवळपास सहा वर्षे थांबावे लागले. त्यातले मावळते अडीच वर्ष आमदारकीविना गेले. हा राजकीय विजनवास राष्ट्रवादीतून संपविण्याच्या दृष्टीने त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत समाविष्टही झाले. मात्र, ही यादी मंजूरच होऊ शकलेली नाही.

अखेरीस विधानसभेतून परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठी त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीने पक्की केलीय.. पण, राज्यसभा निवडणुकीसारखीच विधान परिषदेची निवडणूकही रंगणार असल्याने त्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. संख्याबळानुसार राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी होऊन खडसेंचे आमदार होणे पक्के मानले जातेय.. पण, मविआ सरकार व भाजपतील तीव्र झालेल्या संघर्षात आणि खडसे भाजपच्या राज्यातील नेतृत्वाचे कट्टर शत्रू झाल्यामुळे खडसेंचा आमदार झाल्यानंतरचा मार्गही सोपा नसेल. स्वत: खडसेही ते मान्य करतात. मात्र, मुळातच लढवय्ये असल्याने खडसेंनी त्यासाठीही मनाची तयारी करुन ठेवली असणारच. विधिमंडळ अन्‌ खडसे हे १९९० ते २०१९ या तीस वर्षांचे समीकरण होते, ते अडीच वर्षांत ‘ब्रेक’ झाले. या ‘ब्रेक के बाद’ खडसेंचे आक्रमक भाषण विधिमंडळातील वरिष्ठ सभागृहात म्हणजे परिषदेत गाजेल.. अन्‌ ते मंत्री झाले तर फडणवीसविरुद्ध खडसे हा सामना विधानसभेत रंगेल.


‘ते’ चित्र दुर्मिळच..!

गेल्या काही वर्षांपासून कट्टर प्रतिस्पर्धी झालेल्या खडसे- गिरीश महाजनांनी एकमेकांवर प्रसंगी टोकाची टीका केली. मात्र, विधान परिषद उमेदवारी दाखल करण्याच्या निमित्ताने दोघेही विधानभवनात समोरासमोर आले.. महाजनांनी खडसेंना हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या अन्‌ खडसेंनी त्यांच्या खांद्यावर एक हात ठेवत, त्या सहर्ष स्वीकारल्या. गेल्या काही वर्षांतील हे दुर्मिळ चित्र खडसे- महाजनांच्या जुन्या समर्थकांना सुखावून गेले असणार..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT