Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad esakal
जळगाव

पिंप्राळा नाल्यावरील अतिक्रमण हटविणार : जळगाव मनपा आयुक्त

पावसाळ्यात रामानंदनगरच्या उतारावर असलेला नाल्यावर दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रामानंदनगर ते पिंप्राळा नाल्यात पुराच्या पाणी साठून धोका निर्माण होतो, त्यामुळे वाहतुकही ठप्प होते. ही अडचण दूर करण्यासाठी या नाल्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

पावसाळ्यात रामानंदनगरच्या उतारावर असलेला नाल्यावर दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. त्यामुळे या परिसरातील हरिविठ्ठल, पिंप्राळा परिसरातील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या वर्षी या नाल्याचे पाणी वाहते व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त विद्या गायकवाड व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नाल्याची पाहणी केली. त्यांनी पिंप्राळा परिसरात असलेल्या नाल्यावरील पुलाचीही पाहणी केली, त्यावेळी या नाल्याच्या परिसरात काही अतिक्रमणही आढळून आले. या अतिक्रमणामुळे नाल्याचे पाणी वाहण्यास अडथळे निर्माण होत असल्याने हे अतिक्रमण काढणे आवश्‍यक असल्याचे दिसून आले. आयुक्त विद्या गायकवाड यांनी हे अतिक्रमण ताबडतोब काढण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन पथकास दिले.

सोमवार होणार कारवाई

याबाबत माहिती देताना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले, पावसाळ्यात नाल्याचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होवू नये, यासाठी या नाल्याच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांना रहदारीस त्रास होणार आहे. सोमवारी (ता. २७) अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd ODI: नितीश कुमार रेड्डीची निवड का केली नाही? BCCI चे चिंता वाढवणारे अपडेट्स; नवा ओपनर दुसऱ्या षटकात OUT

SIP Investment: 10,000 ची SIP बनवू शकते 1.86 कोटींचा फंड! पण 90 टक्के गुंतवणूकदार करतात मोठी चूक... स्टेप-अप फॉर्म्युला काय?

Women's T20 World Cup: गतविजेत्या न्यूझीलंडचा धुव्वा उडवत श्रीलंका चमकली; इंग्लंडने आयर्लंडला नमवले पण 'या' मोठ्या धक्क्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : ओमराजे निंबाळकरांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेने धाराशिवमध्ये ठाकरे गट आक्रमकजारो महिलांचा घागर मोर्चा

आपण इंस्टावर फेमस कपल! मेलोडी चॉकलेटनंतर मेलोनींचे मजेशीर विधान, PM मोदींसह फोटो पोस्ट अन्...

SCROLL FOR NEXT