Exotic Birds esakal
जळगाव

Exotic Birds : मेहरूण तलावात विदेशी कलहंसचे दर्शन; जळगावात प्रथमच झाली नोंद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : हिवाळा हा तसा विविध पक्ष्यांच्या स्थलांतराचा ऋतू असतो. तलाव, धरणं, नदीकाठी काही नवीन पाहुणे यानिमित्त पाहायला मिळतात. त्याचा प्रत्यय मेहरूण तलावालगत आला असून, तलावात कलहंस या विदेशी हिवाळी पाहुण्याचे दर्शन झाले.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

कलहंस बदक हा इंग्लंड आणि युरोप निवासी असून, हिवाळ्यात स्थलांतर करून मुख्यत: उत्तर भारतात याचे थवे येतात. दक्षिण भारतात सहसा न आढळणारा किंवा फार क्वचित दिसणाऱ्या कलहंस (Greylag Goose) बदकाचे अनपेक्षित दर्शन झाल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. पक्षी निरीक्षणाच्या १२ वर्षांच्या कालावधीत जळगाव शहरात याची प्रथमच नोंद झाली.

या भागात आढळतो

हा हिवाळी पाहुणा पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, ओडिशा या भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. मध्य प्रदेश व महाराष्ट्रात यांचे दर्शन दुर्मिळ आहे. यांची वीण आईसलँड, स्कॅडिंनेविया, तसेच स्कॉटलंड, बाल्कन्स आणि काळा समुद्र येथे असते.

यांचीही झाली नोंद

यासोबतच रेड डाटा लिस्टमध्ये असलेला तिरंदाज (Oriental Darter) याचेही दर्शन झाले. याशिवाय अटला बदक (Cotton Pigmy-goose), लहान स्वरल (Lesser Whistling-duck), वारकरी (Eurasian Coot), टिबुकली(Little Grebe), हळदीकुंकू बदक (Spot-billed Duck), ठिपकेवली तुतारी (Wood Sandpiper), मोठा पाणकावळा (Greater Cormorant), छोटा पाणकावळा (Little Cormorant), (Lesser Whitethroat) आणि यासोबत काही स्थानिक पक्षी मिळून ३५ जातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याचे गाडगीळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT